PMC बँक प्रकरण : आम्ही जादूगार नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 07:36 PM2019-11-04T19:36:05+5:302019-11-04T19:39:46+5:30

कोर्टाचा याचिकाकर्त्यांना सबुरीचा सल्ला

PMC Bank Case: We are not magicians that will work miracles as we turn the wand | PMC बँक प्रकरण : आम्ही जादूगार नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल

PMC बँक प्रकरण : आम्ही जादूगार नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल

Next
ठळक मुद्दे याप्रकरणी पुढील सुनावणी १९ नोव्हेंबरला होणार आहे. १३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून आरबीआयला निर्देश आज देण्यात आले आहेत. तुम्ही पीएमसी बँक खातेदारांचे बँकेत अडकलेले पैसे वाचविण्यासाठी काय पावलं उचलीत असा सवाल आरबीआयला विचारला आहे.

मुंबई - PMC (पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी) बँक प्रकरणी खातेदारांना दिलासा मिळावा म्हणून काय पावलं उचलली? याबाबत १३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे मुंबईउच्च न्यायालयाकडून आरबीआयला निर्देश आज देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी १९ नोव्हेंबरला होणार आहे. आज सुनावणीदरम्यान 'आम्ही जादूगर नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल' असा कोर्टाने याचिकाकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

पीएमसी बँक प्रकरणी खातेदारांना आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यासाठी घातलेल्या मर्यादेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. आरबीआयच्या वतीने वकील व्यंकटेश धोंड यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालायने तुम्ही पीएमसी बँक खातेदारांचे बँकेत अडकलेले पैसे वाचविण्यासाठी काय पावलं उचलीत असा सवाल आरबीआयला विचारला आहे.

ऐन सणासुदीच्या कालावधीत हजारो खातेदारांना आर्थिकदृट्या असहाय्य बनविलेल्या पीएमसीच्या घोटाळ्याप्रकरणी जलद कार्यवाही करावी, या मागणीसाठी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्त राजवर्धन यांन खातेदारांच्या तीन स्वतंत्र शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेवून गाऱ्हाणी मांडली. याप्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु असून महिन्याभरात बॅँकेचे कामकाज पूर्ववत सुरु केले जाईल, असे आश्वासन राजवर्धन यांनी दिले असल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले होते.अनिमियत कर्ज प्रकरणामुळे तोट्यात आलेल्या पीएमसी बॅँकेच्या ठेवीदारांवर आपली रक्कम काढण्यात गेल्या दीड महिन्यापासून निर्बंध घातले आहेत. तसेच आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील आरबीआयला सवाल करत खातेदारांना तूर्तास दिलासा दिला आहे. 

Web Title: PMC Bank Case: We are not magicians that will work miracles as we turn the wand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.