शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बायकोच्या कटकटीपासून वाचण्यासाठी रचला चोरीचा बनाव; मुलीच्या लग्नाचे पैसे बिटकॉइनमध्ये हरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:13 IST

सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वसई पश्चिमेच्या पापडी परिसरातील साई सर्व्हिसमध्ये तो गाडी खरेदीसाठी टोकन देण्याच्या बहाण्याने गेला. रिक्षातून उतरताना त्याची दहा लाख रुपयांची बॅग एका चोरट्याने पळवली, असा त्याने प्लॅन आखला व तशी तक्रार वसई पोलीस ठाण्यात केली.

नालासोपारा : बिटकॉइनमध्ये हरलेल्या दहा लाख रुपयांबाबत बायकोला कसे सांगायचे? या विचारात विरारमधील एका व्यापाऱ्याने चक्क चोरीचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. मात्र पोलिसांच्या तपासात ही चोरी नसून चोरीचा बनाव असल्याचे लक्षात आले आणि व्यापाऱ्याच्या बनावाचा भांडाफोड झाला. शुभंत लिंगायत असे व्यापाऱ्याचे नाव आहे. विरारमध्ये राहणारा हा व्यापारी मुलीच्या लग्नासाठी जमविलेले दहा लाख रुपये बिटकॉइनमध्ये हरला होता; मात्र याबाबत घरी सांगता येणार नसल्याने आणि बायकोच्या कटकटीपासून वाचण्यासाठी त्याने या पैशांची चोरी झाल्याचा बनाव रचला. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वसई पश्चिमेच्या पापडी परिसरातील साई सर्व्हिसमध्ये तो गाडी खरेदीसाठी टोकन देण्याच्या बहाण्याने गेला. रिक्षातून उतरताना त्याची दहा लाख रुपयांची बॅग एका चोरट्याने पळवली, असा त्याने प्लॅन आखला व तशी तक्रार वसई पोलीस ठाण्यात केली. वसई पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली व सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी व्यापाऱ्याची कसून चौकशी केली असता पोलीसही चक्रावून गेले. मुलीच्या लग्नासाठी जमविलेले पैसे बिटकॉइनमध्ये हरल्याने त्याने हा चोरीचा बनाव आखल्याचे पोलीस तपासात उघड झाले.  हा व्यापारी किराणा दुकानांना मालविक्रीचा व्यवसाय करीत असून बायकोच्या संतापापासून वाचण्यासाठी त्याने हा बनाव केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली आहे. 

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसMumbaiमुंबई