शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मदतीने रचला कट, हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 21:38 IST

खंडणी विरोधी पथकाकडून आरोपी जेरबंद 

ठळक मुद्देयाप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचा किचनचे साहित्य तयार करण्याचा व्यवसाय आहे.

पुणे : हनी ट्रॅपद्वारे वडगाव शेरी येथील एका व्यावसायिकाला ५० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून पकडले. चंदननगरमधील २६ वर्षाच्या तरुणाला पुणे स्टेशन परिसरात ५ लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्विकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांचा किचनचे साहित्य तयार करण्याचा व्यवसाय आहे. वडगाव शेरी परिसरात त्यांची पूर्ण इमारत आहे. त्यामध्ये दुसर्‍या मजल्यावर ते राहतात़ इतर खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील एक खोली रिकामी झाल्याने त्यांनी ती आरोपीला भाड्याने दिली होती. इमारतीच्या पार्किंग परिसरात ते दररोज सकाळी फिरण्यासाठी येत होते़ त्यावेळी आरोपीच्या पत्नीने त्यांना पाहिले़ त्यांना अश्लिल मेसेज पाठवून भेटायला बोलावले़ आरोपी घरी नसताना या महिलेने या व्यावसायिकाला घरी बोलावले़ त्यावेळी त्यांच्यात सहमतीने शारिरीक संबंध निर्माण झाले़ त्यानंतर आरोपीची पत्नी या व्यावसायिकाशी फोन करुन सतत बोलत असत़ त्यानंतर तिने एके दिवशी या व्यावसायिकाला पुन्हा घरी बोलावून घेतले़ त्यावेळी आरोपी घरातच होता़ दोघांना एकत्र पाहिल्यावर आरोपीने या व्यावसायिकाला मारहाण करुन त्याचा मोबाईल हिसकावून घेतला़तसेच दुसऱ्या दिवशी खोली सोडून जात असल्याचे सांगितले आणि खरोखरच तो दुसऱ्या दिवशी खोली सोडून गेला़ त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने या व्यावसायिकाला फोन करुन तुझे व माझ्या पत्नीचे संबंध असल्याची मला कल्पना होती़ त्यामुळे मी अगोदरच घरात सीसीटीव्ही लावून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते, असे सांगितले़ तु रहात असलेल्या परिसरात हे व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी दिली़ हे प्रकरण मिटविण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली़ त्यासाठी आरोपी सातत्याने फोन करुन धमकी देऊ लागला़ तेव्हा या व्यावसायिकाने पोलीस आयुक्तालयात अर्ज केला़ गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या पथकाला कारवाई करण्यास सांगितले. या व्यावसायिकाची तक्रार घेतली जात असतानाच आरोपीचा त्यांना फोन आला व ५ लाख रुपयांची मागणी त्याने केली़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे स्टेशनजवळ सापळा लावला़ या व्यावसायिकाकडून ५ लाख रुपये घेण्यास आलेल्या आरोपीला पकडण्यात आले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

टॅग्स :Arrestअटकhoneytrapहनीट्रॅपPuneपुणेPoliceपोलिस