पिंपरीत सख्या भावांना चाकूने भोसकले, आरोपींचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:43 IST2018-08-07T22:42:43+5:302018-08-07T22:43:19+5:30
गल्लीमध्ये जोरात गाडी चालविल्याच्या रागातून दोन सख्या भावांना चाकूने भोसकून जखमी केले. हा प्रकार थेरगाव येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता घडला.

पिंपरीत सख्या भावांना चाकूने भोसकले, आरोपींचा शोध सुरू
पिंपरी : गल्लीमध्ये जोरात गाडी चालविल्याच्या रागातून दोन सख्या भावांना चाकूने भोसकून जखमी केले. हा प्रकार थेरगाव येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता घडला.
प्रितम जयरवींद्र अडसूळ (२४) आणि प्रेम जयरवींद्र अडसूळ (२७, दोघे रा. संभाजीनगर, थेरगाव) यांच्यावर हल्ला झाला आहे. तर चार पाच तरुणांनी हल्ला केला आहे. हल्लेखोर आणि जखमी पूर्वीचे मित्र आहेत.
मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास गल्लीमध्ये गाडी जोरात चालविण्यावरून त्यांच्यात वाद झाला. यातून पाच जणांच्या टोळक्याने दोघा भावांना पाठीमागून भोसकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. वाकड पोलीस घटनास्थळी पोहचले असून आरोपींचा शोध सुरू आहे.