शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गार्गी कॉलेज लैंगिक शोषणाचा सीबीआय तपासासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 18:19 IST

काहींनी विद्यार्थींनी वाईट भावनेने स्पर्श केला. काहींनी अश्लिल इशारे केले. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या विद्यार्थिनी रडू लागल्या. 

ठळक मुद्दे याप्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  नवी दिल्लीतील गार्गी महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवात कॉलेजच्या विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.

नवी दिल्ली - नवी दिल्लीतील गार्गी कॉलेजमध्ये अलीकडेच खळबळजनक प्रकार घडला. कॉलेजच्या वार्षिक महोत्सवातील एका कार्यक्रमात जबरदस्तीने एका टोळल्याने प्रवेश करून महाविद्यायीन तरुणींचा विनयभंग केला. तसेच या टोळक्यातील काहींनी विद्यार्थिनींसमोर हस्तमैथूनही केले. हा धक्कादायक प्रकार नवी दिल्लीतील गार्गी कॉलेजमध्ये घडला. या वेळी सुरक्षा रक्षकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे विद्यार्थिनींने म्हणणे आहे. या घटनेमुळे राजधानी दिल्लीत असंतोषाची लाट उसळली आहे. याप्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  

नवी दिल्लीतील गार्गी महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवात कॉलेजच्या विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. ६ फेब्रुवारीला या महोत्सवात प्रसिद्ध गायक, कलाकार जुबिन नौटियाल याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दुपारी ३ वाजल्यानंतर गर्दी वाढत गेली. या गर्दीचा फायदा घेत कॉलेजमध्ये कार्यक्रम सुरू असताना कॅम्पसमधून काही बाहेच्या लोकांनी कॉलेजच्या गेटमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. या टोळक्यात अनेक मध्यम वयाचे मुलं होती. त्यापैकी काही आमच्यासमोर थेट हस्तमैथुन करत होते, अशी माहिती या कॉलेजच्या या विद्यार्थिनीने दिली.

काहींनी विद्यार्थींनी वाईट भावनेने स्पर्श केला. काहींनी अश्लिल इशारे केले. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या विद्यार्थिनी रडू लागल्या. हे टोळके २०० ते ३०० लोकांचे होते. काहींनी शर्टची बटणं उघडली तर काहींनी संधी साधत हस्तमैथुन करणे सुरू केले. काहीजण धक्के मारत होते, स्पर्श करत होते. काही लोक महिलांच्या वॉशरुमपर्यंतही आले. त्यांनी बाहेरून कडीही लावली अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली. विशेष म्हणजे पोलीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही. मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली असता उलट त्यांनी विद्यार्थिनींना ओरडत तुम्ही इथे का आलात ? असं विचारले. 

 

 

टॅग्स :MolestationविनयभंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcollegeमहाविद्यालयNew Delhiनवी दिल्लीCBIगुन्हा अन्वेषण विभाग