शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग गोवा सीमेवरील पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी फोडला; १६ लाखांची रोकड लंपास, तालुक्यात खळबळ

By महेश चेमटे | Updated: May 30, 2023 08:55 IST

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महेश सरनाईक -सिंधुदुर्ग : दोडामार्ग व गोवा राज्याच्या सीमेवरील  भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी रविवारी फोडला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यावेळी चोरट्यांनी १६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची तक्रार पेट्रोलपंप मालकाने गोवा दोडामार्ग पोलिस दूरक्षेत्रात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

   दोडामार्ग - गोवा सीमेवर भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या दोन्ही कंपन्यांचे पेट्रोलपंप आहेत. या दोन्ही पंपावर दरदिवशी लाखोंची उलाढाल होते. हे दोन्ही पंप सकाळी ६.३० ते रात्रौ १०.३० पर्यंत खुले असतात.त्यापैकी भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोलपंप रविवारी रात्री बंद करून कामगार घरी गेले. सोमवारी सकाळी ते पुन्हा पेट्रोलपंपवर आले असता त्यांना ऑफिसचे कॅबिन खुले दिसले. कोणी तरी अज्ञातांनी ते फोडल्याचे निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली. लागलीच त्यांनी पंपमालक व गोवा पोलिसांना याबाबत कळविताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.यावेळी १६ लाखांची रोकड लंपास झाल्याची तक्रार पंपमालकाने केली असून त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे मात्र सिमावर्ती भागासह दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Thiefचोरsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस