दीपिका पदुकोणचा 'छपाक' वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 07:33 PM2019-12-23T19:33:13+5:302019-12-23T19:34:18+5:30

चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिका

Petition filed in high court against Chhapaak film starred Deepika Padukone | दीपिका पदुकोणचा 'छपाक' वादाच्या भोवऱ्यात

दीपिका पदुकोणचा 'छपाक' वादाच्या भोवऱ्यात

Next
ठळक मुद्दे या याचिकेवर सुट्टीकालीन खंडपीठ २७ डिसेंबरला सुनावणी घेणार असल्याचे सरोगी यांनी म्हटले आहे.हायकोर्टात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल झाल्याने चित्रपट प्रदर्शित होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. 

मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या 'छपाक' या हिंदी चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 'फॉक्स स्टार'ने कथा चोरल्याचा आरोप करत लेखकाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

'ब्लॅक डे' या आपल्या नोंदणीकृत कथेची चोरी करून चित्रपट बनवल्याचा याचिकाकर्ता लेखक राकेश भारती यांनी दावा केला आहे. ज्येष्ठ वकील अशोक सरोगी यांनी ही याचिका दाखल केली असून या याचिकेवर सुट्टीकालीन खंडपीठ २७ डिसेंबरला सुनावणी घेणार असल्याचे सरोगी यांनी म्हटले आहे.

अ‍ॅसिड हल्ल्यातून सावरून जिद्दीने आयुष्य उभ्या करणा-या लक्ष्मी अग्रवालची कहाणी सांगणारा ‘छपाक’ हा सिनेमा १० जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने या चित्रपटात लक्ष्मीची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र, हायकोर्टात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल झाल्याने चित्रपट प्रदर्शित होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. 

Web Title: Petition filed in high court against Chhapaak film starred Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.