शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर पोलिसांवर आरोप करत कर्जबाजारी तरुणाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 21:03 IST

स्वप्नील सपकाळ याने २०१६ मध्ये राजेंद्र मोरे याच्याकडून प्लॉट घेतला होता़, त्यासाठी कर्ज काढले होते़. त्याप्रकरणात आपली फसवणूक झाली असून मोरे यांनी दिलेले चेक न वटता परत आले़. त्याबाबत सपकाळ याने हडपसर पोलिसांकडे २०१७ मध्ये अर्ज केला होता़

ठळक मुद्दे या प्रकाराने हडपसर पोलीस दलात एकच उडाली खळबळ पत्नी व मुलीलाही मारण्याचा होता विचार

पुणे :पुणे : कर्जबाजारी असलेल्या तरुणाने जमीन व्यवहारात तक्रार घेतली नसल्याचा आरोप करणारी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली़. स्वप्नील दशरथ सपकाळ (वय ३३, रा़ गोंधळेनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे़. सपकाळ याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्याने प्लॉट देऊन फसवणूक करणारा,  हडपसर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्यावर आरोप करुन त्यांना सोडू नका, असे या चिठ्ठीत म्हटले आहे़.  याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन राजेंद्र बाळासाहेब मोरे (रा़ फुरसुंगी गाव) याला अटक केली आहे़. तर पोलीस अधिकाऱ्यांची सहायक पोलीस आयुक्तांमार्फ चौकशी करण्यात येणार आहे़. हडपसर पोलिसांनी सांगितले की, हे सर्व २०१७ मधील प्रकरण असून त्याचवेळी सपकाळ यांच्या अर्जाची चौकशी करुन त्यांना ही दिवाणी बाब असल्याने आपण न्यायालयात जावे, अशी समज दिली असून त्या समजपत्रावर त्यांची सही सुद्धा आहे़. याबाबतची माहिती अशी, स्वप्नील सपकाळ हे गोंधळेनगर येथे रहात असून त्यांना एक मुलगी आहे़. त्यांची पत्नी सध्या गर्भवती आहे़. रविवारी दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़.  त्याअगोदर त्यांनी पोलिसांना एक व्हॉटसअपही केला होता़. त्यांच्या घरात एक चिठ्ठी सापडली़. त्यात त्यांनी आपल्या घरांच्या भावनिक पत्र लिहिले असून त्यात त्याने सर्वांची माफी मागितली आहे़. हे सर्व माझ्यामुळे झाले असल्याचे त्याने म्हटले आहे़. शेवटी त्याने तिघांची नावे लिहिली असून त्यांना सोडू नका असे म्हटले आहे़. स्वप्नील सपकाळ याने २०१६ मध्ये राजेंद्र मोरे याच्याकडून प्लॉट घेतला होता़. त्यासाठी कर्ज काढले होते़.  त्या प्रकरणात आपली फसवणूक झाली असून मोरे यांनी दिलेले चेक न वटता परत आले़. त्याबाबत सपकाळ याने हडपसर पोलिसांकडे २०१७ मध्ये अर्ज केला होता़. त्याची चौकशी करुन ही दिवाणी बाब असल्याचे समजपत्र पोलिसांनी दिले होते़. गुन्हा दाखल न करता पोलिसांनी आपल्याला पैसे मिळवून द्यावेत, असे त्याचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले़. पत्नी व मुलीलाही मारण्याचा होता विचार या चिठ्ठीत त्याने पत्नी अंजली व मुलगी गौरीला मारण्याचा विचार केल्याचे दिसून येते़. त्यात त्याने लिहिले आहे की, अंजली आणि गौरीला पण माज्यासोबत घेऊन जाणार होतो, पण यासाठी तब्बल मी बरोबर दोन महिने विचार केला व नंतर मी स्वत:च जाण्यास सज्ज झालो, असे लिहिले आहे़. यामुळे गर्भवती पत्नी आणि मुलीला मारुन मग आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात गेल्या दोन महिन्यांपासून घोळत असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलिसांनी ही बाब दिवाणी असल्याचे व तसे समजपत्र दिल्याची कागदपत्रे स्वप्नील सपकाळे यांचे वडिल व नातेवाईकांना दाखविली़ त्यांचे समाधान झाले असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या वडिलांची फिर्याद घेऊन मोरे याला अटक करण्यात आली आहे़ . आत्महत्या करण्यापुर्वी स्वप्नील सपकाळ यांनी पोलिसांना एक व्हाटस मेसेज केला आहे. त्यात हडपसर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांनी नावे आहेत. त्यांनी स्वप्नीलच्या प्रकरणाकडे दूर्लक्ष केल्याचे म्हटले आहे़. त्याबाबत संबंधित सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांची सहायक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी करुन लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगितले आहे़. 

टॅग्स :HadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस