शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! "माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ, म्हणून मीच होतो दुनियेतून ऑफ", स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 11:46 IST

Jalgaon News: माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ होतो म्हणून मीच स्वत:च  दुनियेतून ऑफ होत असल्याचे मोबाईलला स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप...

जळगाव - माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ होतो म्हणून मीच स्वत:च  दुनियेतून ऑफ होत असल्याचे मोबाईलला स्टेटस ठेवून हर्षल प्रेमनाथ महाजन (वय २९) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी अयोध्या नगरात उघडकीस आली. (People’s mood off because of me, So I'm off from the world''Youth commits suicide by keeping status)सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल हा जैन कंपनीत कामाला होता.आयोध्या नगरातील सद्गुरु नगरात तृप्ती कॉर्नर जवळ आई-वडील यांच्यासह वास्तव्याला होता. दोन महिन्यापूर्वी त्याचे लग्न झालेले होते. काही दिवसांपूर्वी  पत्नीशी भांडण झाले, त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली, त्या दिवसापासून तो नैराश्यात होता.मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर आई, वडील पुढच्या खोलीत झोपले तर हर्षल मागच्या खोलीत जाऊन झोपला होता. सकाळी आई उठून हर्षल याला उठवायला गेल्या असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.  हे द्रुष्य पाहून आई, वडीलांना मोठा धक्का बसला.त्यांनी प्रचंड आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हेमंत कळसकर व चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. दरम्यान, कळसकर यांनी हर्षलचा मोबाईल तपासला असता त्यात स्टेटस ठेवलेले आढळले. सुसाईड नोट वगैरे काही आढळली नाही, त्यामुळे त्याने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकांच्या मनावर अधिराज्य केलेहर्षल याने पहाटे २.२२ वाजता मोबाईलमध्ये स्टेटस ठेवले. त्यात त्याने म्हटले आहे की, माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ झाले, पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला. लोकांच्या मनावर अधिराज्य केले. काहींच्या डोक्यात आणि मित्र परिवार छान लाभले. माझे आई-वडील दुनियेतील खूप छान देवमाणूस आहे.पुढचा जन्म त्यांच्या पोटी जन्माला येवो ही प्रार्थना देवाला करतो.आणि कोणाला मी या गोष्टीला जिम्मेदार नाही समजत.आणि कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो,मला माफ करा. असे स्टेटस त्याने ठेवले अन् गळफास घेतला.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी