शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कोंबडा हरवला, चोरीच्या संशयावरून दोन कुटुंबात तुफान राडा ; खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 19:17 IST

हरवलेल्या कोंबड्याने घडवले की हो रामायण

राजगुरुनगर : आमच्या कोंबडा तुमच्या दारात आला आहे काय? असेल तर परत द्या असे सारखे विचारले असता तुम्ही आमच्या अंगणात सारख्या फेऱ्या का मारता म्हणून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी औढे (ता. खेड ) येथे दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे याबाबत परपस्पर विरोधात खेडपोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

 याबाबत खेड पोलिसांनी माहितीनुसार, वनिता दत्तात्रय शिंदे (वय४० ) (रा. औढे ता. खेड ) यांनी फिर्याद दिली आहे की, (दि. १२ ) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर राहत असणाऱ्या मनिषा पाटीलबुवा शिंदे या घराबाहेर आवारात फिरत होत्या. दरम्यान फिर्यादी यांचा मुलगा गणेश यांने त्यांना विचारणा केली तुम्ही का सारखे सारखे आमच्या दारात येता त्यावेळी मनिषा शिंदे यांनी सांगितले आमच्या कोंबडा तुमच्याकडे आला आहे काय., असेल तर परत द्या. फिर्यादीच्या मुलाने उत्तर दिले की , तुमचा कोंबडा आमच्याकडे नाही. मनिषा शिंदे यांनी सांगितले त्यावर  आमचा कोंबडा  तुमच्याकडेच आहे, असे म्हणून मनिषा शिंदे व मुलगा आदेश पाटीलबुवा शिंदे, अविनाश घोंगे, रेणुका शिंदे, संदेश काळोखे, पाटीलबुवा बाळशिराम शिंदे, बाळशिराम चिंतामण शिंदे यांना बोलवून गणेश याला दगडाने व काठीने मारहाण केली. दरम्यान फिर्यादी व त्यांचे पती भांडणे सोडवण्यास आले असता पाटीलबुवा शिंदे यांनी फिर्यादीच्या डोक्यात दगड मारला व पतीच्या हाताच्या बरगडीला चाकू सारखी वस्तू मारून गंभीर दुखापत केली आहे. गणेश यांचा हात फॅक्चर झाला आहे. दुसऱ्या फिर्यादीत मनिषा पाटिलबुवा शिंदे (वय३५ ) (रा. औंढे ता खेड ) यांनी नमुद केले आहे कि, आमच्या घरासमोर अंगणात गणेश दत्ता शिंदे, दत्ता शंकर शिंदे, दिनेश दत्ता शिंदे, व इतर ४ जणांनी गर्दी जमवून मी हरविलेला कोंबडा आजुबाजुला शोधत असताना गणेश शिंदे यांने मनिषा शिंदे अश्लील शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच पती पाटीलबुवा शिंदे यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून आम्हास काठीने हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली याबबत दोन्ही बाजुने परस्पर गुन्हे दाखल झाले आहेत पुढील तपास खेड पोलिस करित आहे. 

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस