शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचं घबाड! आरोग्य विभाग DGM च्या घरावर छापा; घाबरुन खिडकीतून फेकले पैसे, दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:30 IST

भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी कारवाई करत विशेष दक्षता पथकाने आरोग्य विभागाचे डीजीएम पंकज कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी कारवाई करत विशेष दक्षता पथकाने (Special Vigilance Unit) आरोग्य विभागाचे डीजीएम पंकज कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या या प्रकरणात छापेमारी दरम्यान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अधिकाऱ्याने पुरावे नष्ट करण्यासाठी घरातील रोख रक्कम आणि दागिने खिडकीतून बाहेर कचऱ्यात फेकून दिले.

दक्षता पथक पंकज कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचलं, तेव्हा त्यांनी घाईघाईत घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने खिडकीबाहेर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले. मात्र सतर्क अधिकाऱ्यांनी तातडीने तो कचरा शोधला आणि फेकलेली सर्व रक्कम व दागिने जप्त केले. आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या BMSICL चे डीजीएम (प्रोजेक्ट) पंकज कुमार यांच्या विविध ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे.

११ वर्षांची नोकरी आणि 'अफाट' संपत्ती

पंकज कुमार यांनी सहाय्यक अभियंता म्हणून आपल्या सेवेची सुरुवात केली होती. अवघ्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी कोट्यवधींची मालमत्ता गोळा केली. प्राथमिक तपासात त्यांच्या उत्पन्नापेक्षा सुमारे १ कोटी रुपये अधिकची मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे. दक्षता पथकाने पंकज कुमार यांच्या एकूण चार ठिकाणांवर एकाच वेळी धाड टाकली. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोख रकमेव्यतिरिक्त जमिनीची कागदपत्रं आणि विविध गुंतवणुकीशी संबंधित दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.

पंकज कुमार सध्या BMSICL (बिहार मेडिकल सर्व्हिसेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेड) मध्ये डीजीएम पदावर कार्यरत आहेत. हा विभाग आरोग्य व्यवस्थेशी संबंधित बांधकाम कामांची जबाबदारी पाहतो. प्रकल्पांमध्ये फेरफार करून ही संपत्ती जमवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नातेवाईकांच्या नावावरही मालमत्ता

दक्षता पथकाच्या सूत्रांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, पंकज कुमार यांनी केवळ स्वतःच्याच नव्हे, तर आपल्या नातेवाईकांच्या नावावरही पाटण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. सध्या ही कारवाई सुरू असून पथक जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी करत आहे. पूर्ण तपासणीनंतरच संपत्तीचा नेमका आकडा स्पष्ट होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Health Official Raided, Throws Cash and Jewelry Out Window.

Web Summary : Bihar health official, Pankaj Kumar, raided for disproportionate assets. He threw cash and jewelry from his window. Authorities seized the assets. Kumar amassed crores in 11 years, exceeding income by ₹1 crore. Raids are ongoing at multiple locations; relatives' assets also under scrutiny.
टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारBiharबिहारMONEYपैसाGoldसोनं