ईदसाठी घरी आलेल्या इंजिनीयरची निर्घृण हत्या; प्रेशर कूकरनं डोक्यावर जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:33 IST2022-05-03T18:30:55+5:302022-05-03T18:33:05+5:30
ईद साजरी करण्यासाठी घरी आलेल्या इंजिनीयरची हत्या; पोलीस तपास सुरू

ईदसाठी घरी आलेल्या इंजिनीयरची निर्घृण हत्या; प्रेशर कूकरनं डोक्यावर जबर मारहाण
पाटणा: बिहारची राजधानी पाटण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीहून ईद साजरी करण्यासाठी आलेल्या अभियंत्याची आरोपींनी निर्घृणपणे हत्या केली. प्रेशर कूकरनं मारहाण करत अभियंत्याला संपवण्यात आलं. गंभीर जखमी झालेल्या अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. रविवारी रात्री ही घटना घडली.
अभियंत्याचा रात्री उशिरा पत्नीसोबत वाद झाला होता. तशी माहिती काही स्थानिकांनी दिली. मात्र पोलिसांनी त्यास दुजोरा दिलेला नाही. मोहम्मद जफरुद्दीन (३५ वर्षे) असं मृत अभियंत्याचं नाव आहे. आरोपींनी जफरुद्दीनवर प्रेशर कूकरनं हल्ला केला. त्याच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाल्याचं फुलवारी शरीफ पोलीस ठाण्याचे एसएचओ इकरार अहमद खान यांनी सांगितलं.
प्राथमिक माहिती आणि परिस्थितीजन्य पुरावे पाहता जफरुद्दीन यांची हत्या लूटमारीच्या उद्देशानं करण्यात आलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अद्याप कुटुंबातील सदस्यांचा जबाब नोंदवलेला नाही. हे प्रकरण संशयास्पद असल्याचं पोलीस म्हणाले. हल्ला झाला त्यावेळी घरात जफरुद्दीन, त्यांची पत्नी शहनाज परवीन आणि दोन अल्पवयीन मुलं होती.