शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पतीत पावनचा कार्यक्रम भोवला; गँगस्टर शरद मोहोळ २ महिन्यांसाठी तडीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 19:46 IST

Gangster Sharad Mohol tadipar for 2 months : १६ साथीदारही हद्दपार

ठळक मुद्देपोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी शरद मोहोळ व त्याच्या १६ साथीदारांना पुढील २ महिने शहरात प्रवेश करण्यास तसेच वास्तव करण्यास मनाई केली आहे.

पुणे : पतित पावन संघटनेच्या शाखेच्या वतीन आयोजित सुर्वण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होऊन आपले शक्ती प्रदर्शन करणे गँगस्टर शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांना चांगलेच भोवले आहे. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी शरद मोहोळ व त्याच्या १६ साथीदारांना पुढील २ महिने शहरात प्रवेश करण्यास तसेच वास्तव करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

शहरात एखादा गुन्हेगार गुन्हे करण्याचे थांबवत नसेल तर त्याला साधारण १ ते २ वर्षांसाठी तडीपार केले जाते. मात्र, या प्रकरणात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांना पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात दोन महिने प्रवेश व वास्तव करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.पतीत पावन संघटनेच्या शाखेचे ५० वा वर्धापन दिनानिमित्ताने गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौकात सत्यनारायण महापुजेचे २६ जानेवारी रोजी आयोजन केले होते. गँगस्टर सचिन मोहोळ व त्यांचे साथीदारांनी बेकायदा गर्दी करुन आरडाओरडा करीत कार्यक्रमाचे ठिकाणी आले. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. तेथे आलेले लोक भितीने घाबरून निघून गेले होते. गँगस्टर गुड शरद मोहोळ हा नुकताच येरवडा करागृहातून गुन्ह्यातून निर्दोष सुटला असल्याने आपली व आपली गँगची पुणे शहरात पूर्वीप्रमाणे दहशत रहावी, या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी दहशत निर्माण केली. तसेच कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून कोणतीही काळजी घेतली नव्हती. त्यामुळे खडक पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी त्याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता.शरद मोहोळ व त्याचे १६ साथीदारांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. शरद मोहोळ यांच्या आक्रमक वागणुकीमुळे व वर्तनामुळे विघातक घटना होऊन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याला व त्याच्या साथीदारांना शहर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेyerwada jailयेरवडा जेलcorona virusकोरोना वायरस बातम्या