शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

पसार तरुणाला पुणे पोलिसांनी पकडले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 17:25 IST

त्याला संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

 रामप्रसाद चांदघोडे -

घारगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आणि एक वर्षापासून पसार असलेल्या ४० वर्षीय तरुणाला पुणे जिल्ह्यातील पोलिसांनी पकडले. आळेफाटा ग्रामीण पोलिसांनी रविवारी ( दि.३०) पसार असलेल्या नवनाथ आनंदा चव्हाण ( वय ४०, रा. कोठे बुद्रुक, ता. संगमनेर ) याला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून पकडले, त्याला संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

    याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घारगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत अल्पवयीन मुलीवर नवनाथ चव्हाण याने २३ एप्रिल २०२२ ला  अत्याचार केला होता. त्यानुसार घारगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ प्रमाणे अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३ (२) (५) व  इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो पसार होता. आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पसार असलेल्या आरोपींचा शोध मोहिमेबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार आळेफाटा पोलीस  आरोपींचा शोध घेत असताना त्यांना पिंपळवंडी परिसरात एक संशयित व्यक्ती मिळून आली. त्यांनी त्यास ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याचे नाव नवनाथ चव्हाण असे समजले. त्याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तो गुन्हा घडल्यापासून पसार असल्याचे निष्पन्न झाले. आळेफाटा पोलिसांनी चव्हाण याला घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. 

    उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार, विनोद गायकवाड, पंकज पारखे, पोपट कोकाटे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, सचिन राहणे, प्रशांत तांगडकर यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग