लहान मुलांच्या भांडणात आई वडिलांनी शेजाऱ्याच्या मुलाला बेदम मारले

By विलास जळकोटकर | Updated: May 25, 2023 15:54 IST2023-05-25T15:54:19+5:302023-05-25T15:54:31+5:30

पोलीस ठाण्यासमोरील नगरात घडला प्रकार 

Parents beaten neighbor's son in a fight between children | लहान मुलांच्या भांडणात आई वडिलांनी शेजाऱ्याच्या मुलाला बेदम मारले

लहान मुलांच्या भांडणात आई वडिलांनी शेजाऱ्याच्या मुलाला बेदम मारले

सोलापूर - लहान मुलांच्या भांडणामध्ये पडून आई- वडिलांनी माझ्या मुलाला का मारतो म्हणून शेजाऱ्याच्या १५ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करुन जखमी केले. सदर बझार पोलीस ठाण्यासमोरील केशव नगरात बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

मुसद्दिक समीर जहागिरदार (वय १५) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला सादिक फनीबंद व निलोफर फनीबंद या पती-पत्नींनी मारहाण केली. मुसद्दिक याचे सादिक यांच्या मुलाबरोबर भांडण सुरु होते. तेव्हा सादिक आणि त्यांची पत्नी निलोफर हे त्या भांडणात पडले. त्यांनी माझ्या मुलाला मारहाण करतो म्हणून मुसद्दिक याला मारहाण केली. यामध्ये त्याच्या सर्वांगास मुक्का मार लागला. यामुळे मुसद्दिक यास आई नसरीन यांनी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Parents beaten neighbor's son in a fight between children