पालकांनो सावधान! 11 वर्षीय मुलाच्या हातात प्रवेशद्वारावरील टोक घुसलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 21:11 IST2019-04-30T21:10:26+5:302019-04-30T21:11:57+5:30
आता उन्हाळाची सुट्टी लागली असून पालकांनी अधिक सतर्क राहून आपल्या पाल्याकडे लक्ष देणं महत्वाचं असल्याचं या दुर्घटनेमुळे प्रकर्षाने जाणवत आहे.

पालकांनो सावधान! 11 वर्षीय मुलाच्या हातात प्रवेशद्वारावरील टोक घुसलं
ठळक मुद्देहर्ष शिंदे असं या जखमी मुलाचे नाव आहे. तो लुईसवाडी भागात राहतो. अतिशय थरारक आणि अंगावर शहारा आणणारी दुर्घटना होती त्याची सुखरुप सुटका केल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत
ठाणे - लोखंडी प्रवेशद्वारावरील असलेले तीक्ष्ण टोक हातात घुसलेल्या 11 वर्षीय मुलाची ठाणे अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली. हर्ष शिंदे असं या जखमी मुलाचे नाव आहे. तो लुईसवाडी भागात राहतो. अतिशय थरारक आणि अंगावर शहारा आणणारी दुर्घटना होती असून अग्निशामन दलाला घटनेची माहिती मिळताच एक फायर इंजिन घटनास्थळी पाठवण्यात आले. त्याची सुखरुप सुटका केल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता उन्हाळाची सुट्टी लागली असून पालकांनी अधिक सतर्क राहून आपल्या पाल्याकडे लक्ष देणं महत्वाचं असल्याचं या दुर्घटनेमुळे प्रकर्षाने जाणवत आहे.