परमबीर सिंग खंडणी प्रकरण; संजय पुनामिया याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 09:00 IST2021-08-25T09:00:33+5:302021-08-25T09:00:47+5:30
ठाणेनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

परमबीर सिंग खंडणी प्रकरण; संजय पुनामिया याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई तसेच ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात ठाणेनगर पोलिसांनी संजय पुनामिया याला मंगळवारी अटक केली. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
केतन तन्ना तसेच सोनू जालान यांच्या तक्रारीवरून ३० जुलै रोजी परमबीर सिंग यांच्यासह पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि पुनामिया आदी २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परमबीर सिंग, पुनामिया यांच्यासह पाच जणांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यातही यापूर्वी खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच गुन्ह्यात पुनामिया याला कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्याला कोपरी पोलिसांच्या ताब्यातून ठाणेनगर पोलिसांनी घेतले.
यापूर्वीच न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
nया प्रकरणातील पुनामिया याच्यासह देवेंद्र आणि अंकित भानुशाली यांचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच न्यायालयाने फेटाळला असून, प्रदीप शर्मा, विकास दाभाडे आणि सुनील देसाई यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्जही यापूर्वीच मागे घेतला आहे.