शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला की परमबीर सिंग; मुख्यमंत्र्यांसमोर पेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 20:14 IST

मुंबई पोलीस आयुक्तपदी पहिल्यांदा महिला अधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता 

ठळक मुद्देरश्मी शुक्ल या सध्या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त आहेत. ३१ ऑगस्टला मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे निवृत्त होत असून त्यांना मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती मिळत आहे. रश्मी शुक्ला यांनी याआधी पुणे शहराचे आयुक्तपद सांभाळलेले आहे.

मुंबई - मुंबई पोलीसआयुक्तपदाच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण मुंबई शहराचं पोलीस आयुक्त आयपीएस अधिकाऱ्यांचं स्वप्न असत. मात्र, मुंबईला पहिल्यांदाच महिला पोलीस आयुक्त मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रश्मी शुक्ल या सध्या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त आहेत. ३१ ऑगस्टला मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे निवृत्त होत असून त्यांना मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती मिळत आहे. 

सध्याचे मुंबईचे  पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ मिळणार नसल्याने नव्या अधिकाऱ्याची आयुक्त पदी नेमणूक करण्यात येईल. या पदासाठी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.  त्यांच्याव्यतिरिक्त लाचलुचपत विभागाचे (एसीबी)  महासंचालक परमबीर सिंह यांचे देखील नाव चर्चेत आहे.

रश्मी शुक्ला यांनी याआधी पुणे शहराचे आयुक्तपद सांभाळलेले आहे.  सध्याचे आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यायचा आहे. बर्वे यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. सुबोध जायसवाल यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळाल्यानंतर बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळेसही परमबीर सिंह यांचे नाव आयुक्तपदाच्या शर्यतीत घेतले जात होते. सुबोध जायसवाल हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तर संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आणि १९८७ बॅचचे संजय बर्वे, बिपीन बिहारी, एस. एन. पांडे, हेमंत नगराळे हे आहेत तर परमबीर सिंग, रश्मी शुक्ला, रजनीश शेठ आणि के. वेंकटेशम हे १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRashmi Shuklaरश्मी शुक्ला