शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 14:07 IST

भार्इंदरच्या नवघर पोलिसांनी रीना मेहता महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देतिघांचेही मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. पेपर फुटल्याचे लक्षात येताच परांजपे यांनी अन्य शिक्षकांच्या साहाय्याने तपासणी सुरू केली असता फरहान खान या परीक्षार्थ्याच्या मोबाइलवरही तीच उत्तरे आढळली.मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सध्या सुरू आहेत.

भार्इंदर : मुंबई विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा तृतीय वर्षाचा अर्थशास्त्राचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटल्याप्रकरणी भार्इंदरच्या नवघर पोलिसांनी रीना मेहता महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या तिघांचेही मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सध्या सुरू आहेत. भार्इंदर पूर्वेच्या अभिनव महाविद्यालयात परीक्षेचे केंद्र आहे. शुक्रवारी ५ एप्रिल रोजी वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाचा अर्थशास्त्राचा पेपर होता. सकाळी १०.३० वा. परीक्षा सुरू होणार होती. त्याआधी सव्वादहाच्या सुमारास शिक्षक मयूर दमासिया हे स्वच्छतागृहात गेले असता तेथे आलोक चतुर्वेदी हा परीक्षार्थी मोबाइलमध्ये काही वाचत होता. दमासिया यांनी त्याला हटकत मोबाइल पाहण्यासाठी घेतला असता त्यात काही वेळाने सुरू होणाऱ्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नांची उत्तरे होती. दमासिया यांनी चतुर्वेदीला तत्काळ प्राचार्य तथा परीक्षा केंद्रप्रमुख केशव परांजपे यांच्या दालनात नेले. परांजपे यांनी मोबाइल पाहिला असता, त्यात अर्थशास्त्राच्या पेपरमधील पहिल्या प्रश्नांची क्रमवार उत्तरं होती. बाराही उपप्रश्नांची उत्तरे क्रमनिहाय होती. पेपर फुटल्याचे लक्षात येताच परांजपे यांनी अन्य शिक्षकांच्या साहाय्याने तपासणी सुरू केली असता फरहान खान या परीक्षार्थ्याच्या मोबाइलवरही तीच उत्तरे आढळली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीexamपरीक्षाPoliceपोलिस