शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'पप्पांनी मम्मीला जिवंत जाळले...'; ३५ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीची हत्या, मुलाने समोर आणलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 10:43 IST

उत्तर प्रदेशात विवाहितीचे सासरच्यांनी छळ करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nikki Murder Case:उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एका पतीने हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ वर्षीय निक्कीला तिच्या पतीने आणि सासरच्यांनी पेट्रोल ओतून जिवंत जाळले. ही घटना २१ ऑगस्टच्या रात्री घडली आणि रुग्णालयात नेत असताना निक्कीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ निकीच्या बहिणीने तिच्या फोनवर रेकॉर्ड केला आहे, ज्यामध्ये तिच्या सासरचे निक्कीला मारहाण करताना दिसत आहेत.

नऊ वर्षांपूर्वी ग्रेटर नोएडाच्या घंगोला गावातील विपिन नावाच्या तरुणाशी निक्कीचा विवाह झाला होता.निक्कीची बहीण कांचन हिचेही लग्न विपिनच्या भावाशी झाले होते. लग्नापासून निक्की आणि तिच्या बहिणीचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. सासरच्यांनी ३५-३६ लाख रुपयांची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने निक्कीला सतत मारहाण करण्यात येत होती आणि शेवटी तिला जिवंत जाळण्यात आले. निक्कीला तिच्या घरात मारहाण करून जिवंत जाळल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्यावर होणारी क्रूरता स्पष्टपणे दिसून येते. निक्कीच्या निष्पाप मुलाने पप्पांनी आईला लाईटरने जाळले, असं म्हणत या सगळ्या प्रकाराला वाचा फोडली.

निक्कीचे सासरचे लोक सतत ३५ लाख रुपयांची मागणी करत होते. लग्नात स्कॉर्पिओ गाडी आणि इतर अनेक गोष्टी देऊनही त्यांच्या मागण्या संपल्या नाहीत.निक्कीच्या म्हणण्यानुसार, २१ ऑगस्ट रोजी निकीचा पती विपिन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला बेदम मारहाण केली. यानंतर निक्कीवर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून देण्यात आले. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला आधी फोर्टिस रुग्णालयात त्यानंतर तेथून तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला.

यानंतर निक्कीच्या धाकट्या मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आला, ज्यामध्ये तो स्पष्टपणे म्हणतो की,"पप्पांनी माझ्या आईच्या अंगावर काहीतरी ओतले, नंतर तिला कानाखाली मारली आणि नंतर लाईटरने तिला पेटवून दिले." हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी विपिनला अटक करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDomestic Violenceघरगुती हिंसा