शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 21:48 IST

Murder Case : प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. २२ वर्षीय गुडिया बेसरा असे मृत तरुणीचे नाव आहे. ती झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील भेलवाघाटी येथील रहिवासी होती.

जमुई - बिहारमधील जमुई जिल्ह्यात प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही घटना चंद्रमंडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. लग्न न करता ही तरुणी चार वर्षांपासून प्रियकराच्या घरी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तरुणीचा मृतदेह मंगळवारी येथे आढळून आला, तर प्रियकर आणि त्याचे कुटुंबीय घटनास्थळावरून फरार झाले आहेत. याची माहिती मिळताच मृताचे नातेवाईक तेथे पोहोचले. त्याने प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. २२ वर्षीय गुडिया बेसरा असे मृत तरुणीचे नाव आहे. ती झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील भेलवाघाटी येथील रहिवासी होती.मिळालेल्या माहितीनुसार, गुडियाचे बबलू तुड्डू नावाच्या तरुणासोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. चार वर्षांपासून लग्न न करता ती प्रियकराच्या घरी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. गुडियाचे वडील मुन्शी बेसरा सांगतात की, माझ्या मुलीचे आणि बबलू तुड्डूचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, त्यामुळे दोघेही एकत्र राहण्यास तयार झाले. आमच्या कुटुंबातील आणि समाजातील लोकांनी दोघांना लग्न करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. पुढे सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी बबलू तुड्डूने मोटारसायकल घेण्यासाठी पैसे मागितले होते. त्यावर तुझे लग्नच झाले नाही तर पैसे का द्यायचे असे गुडियाच्या कुटुंबीयांनी उत्तर दिले. मंगळवारी सकाळी गुडियाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पण हे चुकीचे आहे, माझ्या मुलीची हत्या झाली आहे, असे मृत मुलीचे वडील म्हणाले.कुटुंबीयांनी प्रियकरावर मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहेत्याचवेळी मृताच्या वहिनीनेही तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. ती म्हणते की माझी नंणद सांगायची की तिचा प्रियकर तिला अनेकदा मारहाण करतो आणि एक वर्षापासून तिला ते असह्य झाले होते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या बबलूने गुडियाचा गळा आवळून खून केला.या संदर्भात चंद्रमंडीह पोलीस ठाण्याचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर बबलू तुड्डू याच्यावर हत्येचा आरोप करत तक्रार केली आहे. पोलिस खून आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. फरार आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच प्रकरण स्पष्ट होईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूBiharबिहार