शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत खळबळ! गरोदर शिक्षिकेची भरदिवसा निर्घृण हत्या, निर्माण झाले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 12:45 IST

Murder Case : मग मारेकऱ्यांनी ही घटना कशी घडवली? यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात घरात काम करणाऱ्या कामगारांचीही चौकशी केली जात आहे.

अयोध्या कोतवाली परिसरातील श्रीराम पुरम कॉलनीत गरोदर शिक्षिका सुप्रिया वर्मा यांची भरदिवसा घरात हत्या करण्यात आली. घटनेनंतर मारेकरी फरार झाले, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी एक पथकही तयार केले आहे.ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. मात्र, पोलिसांना घटनेची माहिती उशिरा मिळाली. यामागचे कारण असे सांगितले जात आहे की, मृत महिलेचा पती आणि तिच्या सासूला आधी तिचा गर्भपात झाला असे वाटले. पण जेव्हा मृत महिलेला तिला ट्रॉमा सेंटरमध्ये घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, ही हत्या आहे आणि गळ्यावर चाकूने वार केले होते. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस अयोध्येतील दर्शन नगर येथील ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले. घटनेच्या वेळी शिक्षिका घरात एकटीच होती. तिची सासू आणि पती काही कामानिमित्त फैजाबाद शहरात आले होते. ते परत आल्यावर त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांच्या बांधकामाधीन घरात काम सुरू होते आणि काही कामगारही काम करत होते.

मग मारेकऱ्यांनी ही घटना कशी घडवली? यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात घरात काम करणाऱ्या कामगारांचीही चौकशी केली जात आहे. सुप्रिया वर्मा नावाच्या या शिक्षिका बिकापूर ब्लॉकच्या अस्करनपूर प्राथमिक शाळेत शिकवत होत्या आणि त्यांचे पती देखील बिकापूर ब्लॉकमध्ये शिक्षक आहेत.

सध्या पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून मृतदेहावर चाकूने वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. सुरुवातीला घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी लूटमारीच्या उद्देशाने ही हत्या केल्याची चर्चा होती, मात्र दिवसाढवळ्या घरात काम सुरू असताना दरोडेखोरांनी असा काही प्रकार केला का, असाही मोठा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे घटनेच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलीस मृताचे कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांची तसेच घरात काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करत आहेत. यासोबतच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात असून मारेकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.लवकरच या घटनेचा खुलासा केला जाईल, असे अयोध्या पोलिसांचे म्हणणे आहे. काही महत्त्वाचे क्लूजही पोलिसांच्या हाती लागले असून, त्याचीही पडताळणी सुरू आहे. मृतांचे नातेवाईकही पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत, त्यामुळेच या घटनेबाबत त्यांची आणि त्यांच्या जवळच्या मित्रांचीही चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAyodhyaअयोध्याpregnant womanगर्भवती महिलाTeacherशिक्षक