आर्थर रोड जेलमध्ये खळबळ, उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीवर हल्ला
By पूनम अपराज | Updated: July 27, 2022 13:52 IST2022-07-27T13:18:59+5:302022-07-27T13:52:23+5:30
Umesh Kolhe Murder Case : शाहरुख आणि हल्लेखोर एकाच बराकमध्ये राहत होते. याबाबत एन एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थर रोड जेलमध्ये खळबळ, उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीवर हल्ला
पूनम अपराज
मुंबई : नुपूर शर्मा वादाचे पडसाद तुरुंगात देखील उमटू लागले आहे. उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीवर तुरुगात हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पाच जणांनी मिळून आरोपीवर आर्थर रोड तुरुंगात हल्ला केला आहे. २३ जुलैला आरोपी शाहरुख पठाणला बेदम मारहाण करण्यात आली. शाहरुख आणि हल्लेखोर एकाच बराक नंबर ७ मध्ये राहत होते. याबाबत एन एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यामुळे कारागृह प्रशासनातही खळबळ माजली आहे. या प्रकरणानंतर हल्लेखोरांना वेगवगेळ्या बराकमध्ये हलवण्यात आलं आहे. एकाच बराकमध्ये असलेल्या आरोपींनी उमेश कोल्हे प्रकरणातील आरोपीवर प्राणघातक हल्ला केला. आर्थर रोड तुरुंगातील आरोपीवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता प्रशासनाने तात्काळ त्यांना वेगवेगळ्या बराकमध्ये हलवण्यात आलं आहे.
काय आहे उमेश कोल्हे हत्या प्रकरण?
२१ जून रोजी रात्री येथील प्रभात चौकाकडून श्याम चौकाकडे निघणाऱ्या गल्लीत उमेश कोल्हे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. २ जुलै रोजी तो खून भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचा खुलासा शहर पोलिसांनी केला होता.