शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत खळबळ! विद्यार्थ्यांसह गायब झालेली स्कूल बस पोलिसांना सापडली, तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 21:21 IST

Poddar International School Bus was Missing : अखेर मुंबई पोलीस अधिकऱ्यांना ही बस विद्यार्थ्यांसह सापडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान स्कूल बस नेमकी कुठे होती?, शाळेसोबत/पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

मुंबई - शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस अजूनही न पोहोचल्याने पालकांची चिंता वाढली होती. सांताक्रूझ येथील पोद्दार शाळेची ही बस आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने निघाली, मात्र विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचली नव्हती. त्यामुळे चिंतातुर पालकांनी तात्काळ शाळेकडे धाव घेतली आणि विचारणा केली. या स्कूल बसच्या चालकाचा मोबाईल बंद येत असल्याने पालक अधिकच धास्तावले होते. अखेर मुंबई पोलीस अधिकऱ्यांना ही बस विद्यार्थ्यांसह सापडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान स्कूल बस नेमकी कुठे होती?, शाळेसोबत अथवा पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  

मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील पोद्दार स्कूल आहे. या शाळेची विद्यार्थ्यांना ने-आण करणारी बस आहे. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरातून घेऊन शाळेत बस गेली. दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली. मात्र बस शाळेतून बाहेर पडली असली तरी ती बस घरापर्यंत पोहोचलीच नव्हती. शाळा सुटून जवळपास 4 तास बसचा पत्ता लागला नव्हता. ही बस नेमकी कुठे होती? याचाही तपास पोलीस करत आहे. शाळेत गेलेली आपली लहान मुलं अजून घरी न परतल्याने विद्यार्थ्यांचे पालक काळजीत होते. पालकांकडून शाळा प्रशासन, स्कूल बसचालकाला फोन लावण्याचा प्रयत्न केले गेले. हे विद्यार्थी सकाळी 6 वाजता शाळेत गेले होते. मात्र अजूनही घरी न परतल्याने पालकांची चिंता वाढली होती.

शाळेला गेलेली मुलं अजूनही घरी परत न आल्याने पालकांनी आपल्या पाल्याचा शोध घेण्यासाठी जिकडेतिकडे  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पालकांनी स्कूलबसच्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ड्रायव्हर आणि बसमधील कर्मचाऱ्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र अधिकृत माहिती मिळालेली नाही. ही मुलं नेमकी कोणत्या वयोगटातील आहेत, बसमध्ये मुला-मुलींची संख्या किती, याबाबतची कोणतीही सविस्तर माहिती अजून मिळालेली नाही.

टॅग्स :SchoolशाळाMumbaiमुंबईPoliceपोलिसStudentविद्यार्थीMissingबेपत्ता होणं