शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Oxygen Tanker Missing : ऑक्सिजनने भरलेला टँकर बेपत्ता; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:26 IST

Oxygen Tanker Missing : हा टँकर इच्छितस्थळी पोहोचलाच नाही अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर मनजीत सिंग यांनी माहिती दिली.  

ठळक मुद्देदेशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला असून त्यादरम्यान टँकर चोरीस गेल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे.

हरियाणा येथे पानीपत रिफायनरीहून सिरसा येथे जात असलेला ऑक्सिजन द्रव्याने भरलेला टँकर बेपत्ता झाला आहे. पानीपतमधील ड्रग कंट्रोल ऑफिसर विजय राजे यांनी या प्रकरणी पानिपतच्या बोहली पोलीस ठाण्यात ऑक्सिजन टँकर चोरी झाल्याची तक्रार केली आहे. हा टँकर पानीपतहून सिरसाला रवाना करण्यात आला होता. दरम्यान, हा टँकर इच्छितस्थळी पोहोचलाच नाही अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर मनजीत सिंग यांनी माहिती दिली.  

देशातील अनेक कोविड हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला असून त्यादरम्यान टँकर चोरीस गेल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे. आता पानीपतसह सिरसाचे पोलिसही टँकरचा शोध घेत घेत आहेत. टँकरवर पंजाबचा नंबर असून चालकही बेपत्ता आहे. पानीपत रिफायनरीमध्ये एअर लिक्विड नॉर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करते. या कंपनीतून बुधवारी रात्री एक ऑक्सिजन टँकर सिरसाला रवाना करण्यात आला होता. या टँकरमध्ये ८ टन ऑक्सिजन आहे. याची किंमत जवळपास १ लाख १० हजार रुपये इतकी आहे.

पानीपतहून सिरसाला पोहोचण्यासाठी सव्वा चार तास इतका कालावधी लागतो. मात्र, या वेळेत सिरसामध्ये टँकर न पोहोचल्याने पानीपतमध्ये कंपनीत संपर्क करण्यात आला. या प्रकरणी ड्रग कंट्रोल ऑफिसरलाही कळवण्यात आलं. टँकर चालकाचा फोनही बंद येत आहे. टँकरचा शोध सुरू आहे. टँकर चालकाचे शेवटचे लोकेशन तपासले जात आहे. मोबाइलचे कॉल डिटेल्स काढले जात आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.दुसर्‍या घटनेत हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी बुधवारी असा आरोप केला होता की, पानिपतहून फरीदाबादकडे रूग्णालयांमधील कोविड रूग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन जाणारे टँकर दिल्ली सरकारकडून त्यांच्या सीमेवर लुटले होते.

टॅग्स :RobberyचोरीHaryanaहरयाणाPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीAnil Vijअनिल विज