The owner was raping her in a moving car; The car driver was driving the car at Madhya Pradesh | धक्कादायक! चालत्या कारमध्ये मालक करत होता बलात्कार; कार ड्रायव्हर चालवत होता गाडी

धक्कादायक! चालत्या कारमध्ये मालक करत होता बलात्कार; कार ड्रायव्हर चालवत होता गाडी

मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यात पीडित महिलेने खळबळजनक आरोप लावला आहे, एका इसमाने तिला फॅक्टरीत काम करण्याच्या बहाण्याने त्याच्या गाडीत बसवलं, त्यानंतर चालत्या कारमध्ये तिच्यासोबत बलात्कार केला, इतकचं नाही तर हॉटेलमध्ये घेऊन जात तिथेही रुममध्ये बलात्कार केला.(Rape in Car at Madhya Pradesh)  

ग्वालियर जिल्ह्यातील कुलैथ गावात ही घटना घडली, महिलेने एका व्यक्तीवर चालत्या कारमध्ये बलात्कार आणि कारचालकाने त्याला मदत केल्याचा आरोप केला आहे. या महिलेनं असा दावा केला आहे की, रामबाबू गुर्जर फॅक्टरीत काम करण्याच्या बहाण्याने ग्वालियरच्या प्राणीसंग्रहालयापासून टवेरा गाडीतून घेऊन गेला, त्यानंतर चालत्या कारमध्ये माझ्यासोबत बलात्कार केला, यावेळी कारचा ड्रायव्हर गाडी चालवत राहिला तर मालक बलात्कार करत होता. त्यानंतर एका हॉटेलमध्ये जाऊन तिथेही जबरदस्ती करण्यात आली.

महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर याचा तपास करण्यात आला, पोलिसने आरोपी रामबाबू गुर्जर आणि त्याच्या सहकारी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. याबाबत गुन्हे शाखेचे डीसीपी विजय भदौरिया म्हणाले की, पीडित महिलेने सोमवारी तक्रार केली होती, तिच्यासोबत चालत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला, त्यानंतर हॉटेलमध्येही तिच्यावर अत्याचार झाले, महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली आहे.

 

 

Web Title: The owner was raping her in a moving car; The car driver was driving the car at Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.