शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

ओशिवरा गोळीबार प्रकरणी मृत तरुणाचा बाप संशयाच्या भोवऱ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 21:35 IST

पोलिसांनी मृत विकीचे वडील श्रीनिवास गंजी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

ठळक मुद्दे मृत विकी श्रीनिवास गांजी (३३) रा. जोगेश्वरी याची हत्या बंदुकीच्या गोळीबारात अज्ञातांनी केली. खुनासाठी वापरलेली रिव्हॉल्व्हर हि फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आलेली आहे. 

मुंबई -  ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदुकीने गोळीबार करीत राहत्या घरी एका ३३ वर्षीय तरुणाची हत्या काल सायंकाळी ८. ३० वाजताच्या सुमारास करण्यात आली आले. ओशिवरा पोलिसांनी पहिल्यांदा अपमृत्यूची नोंद केली होती. नंतर आज हत्येचा गुन्हा दाखल करून मृत तरुण विकी गंजीच्या पित्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पित्याच्या अनैतिक संबंधाला बाधा आणि विरोध असल्याने सुडापोटी हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी मृत विकीचे वडील श्रीनिवास गंजी याला अटक करण्यात आली आहे. मृत विकी श्रीनिवास गंजी (३३) रा. जोगेश्वरी याची हत्या बंदुकीच्या गोळीबारात अज्ञातांनी केली. रॉकी गंजी हा जोगेश्वरीतील  नर्मदा सोसायटी रूम  क्र ३११ मध्ये वडील श्रीनिवास आणि मोठा भाऊ विकी यांच्यासोबत राहत होता. मृतक विकीची आई नेटी सांताक्रूझ परिसरात वेगळी राहते, विकी हा दीडवर्षापासून बेरोजगार होता. तर लहान भाऊ रॉकी हा एका कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो आपला भाऊ विकी याची गोळीबारात हत्या झाल्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी मृत विकीचे वडील श्रीनिवास गंजी याला ताब्यात घेतले. घटनेनंतर श्रीनिवास यांनीच विकी याला मृतावस्थेत सर्वप्रथम पहिले. या घटनेत स्थानिक नागरिकांनी मात्र पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मृत विकी आणि पिता श्रीनिवास यांच्यात पटत नव्हते तर विकी हा घटस्फोटित आहे. श्रीनिवास यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यामुळे श्रीनिवास आणि मृत विकी यांच्यात वारंवार भांडणे होत होती. विकीच्या पत्नीने घर सोडल्यानंतर श्रीवास हा एका महिलेला घरापर्यंत आणत होता. यामुळे भांडणे होत होती. ही भांडणं इतकी विकोपाला गेली की, श्रीनिवास आणि विकी यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळेच विकी याच्या हत्येनंतर ओशिवरा पोलिसांनी अनैतिक संबंधाला अडचण ठरणाऱ्या विकीचा काटा त्याचे वडील श्रीनिवास यांनी काढला असावा या संशयापोटी पोलिसांनी श्रीनिवास याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खुनासाठी वापरलेली रिव्हॉल्व्हर हि फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आलेली आहे. या हत्येप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपस करीत आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार