शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुण्यातून चार सराईत गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:28 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी चौघा सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे़.  

ठळक मुद्देघरफोडी, दरोड्याची तयारी व बेकायदेशीर जमाव जमवून जातीत तेढ निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी चौघा सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे़.  गणेश सतीश जाधव (वय २०, रा़ कासेवाडी, भवानी पेठ) याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात घरफोडी, दरोड्याची तयारी व बेकायदेशीर जमाव जमवून जातीत तेढ निर्माण करणे यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत़. घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला ८ महिन्यांची कैदेची शिक्षा झाली होती़. ती भोगून तो परत आल्यानंतरही त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही़. कासेवाडी भागात त्याने दहशत निर्माण केली आहे़. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता़. पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी त्याची पडताळणी करुन त्याला एक वर्ष तडीपार केले आहे़. शुभम बाळासाहेब हनमघर (वय २०, रा़ रामनगर, वारजे माळवाडी) या सराईत गुन्हेगाराला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले़. हनमघर याच्यावर शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, मारामारी करणे असे गंभीर गुन्हे वारजे व पौड पोलीस ठाण्यात दाखल आहेत़. या परिसरात त्याची दहशत असल्याने पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी त्याला २ वषार्साठी तडीपार केले आहे़. टोळीप्रमुख किशोर शंकर मोरे (वय २६, रा़ डायसप्लॉट, गुलटेकडी) आणि टोळी सदस्य आकाश गोविंद गायकवाड (वय २०, रा़ गोलघर, पर्वती दर्शन) या दोघांना पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे़. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गुन्हेगारी टोळीतील हे दोघे एकत्रित व वैयक्तिक गुन्हे करत होते़. त्यांच्याविरुद्ध मारहाण करणे, धमकी देणे, जबरी चोरी, प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे असे गंभीर गुन्हे आहेत़. या परिसरात त्यांची दहशत असल्याने दोघांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस