ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:01 IST2025-01-11T16:00:55+5:302025-01-11T16:01:22+5:30

पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले.

Operation Dhaka! Who is behind the Bangladeshi infiltrators?; Delhi to Mumbai racket exposed, SIT Form for investigation by Maharashtra Government | ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश

ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई - राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर मोठी कारवाई झाली आहे. घुसखोरांविरोधात २ शहरांमध्ये एसआयटी तपासणी सुरू आहे. अनेकांकडून बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. तपासाच्या चौकटीत अनेक सरकारी अधिकारी आणि नेतेही आहेत. व्होटबँकसाठी बनावट कागदपत्रे बनवले जातात. ही कागदपत्रे बनवण्यामागे मोठं रॅकेट आहे जे बांगलादेशी घुसखोरांना राज्याच्या विविध शहरांमध्ये स्थायिक करण्याचं कट रचत आहेत.

बरेच बांगलादेशी घुसखोर असे आहेत जे मागील अनेक वर्ष भारतात ओळख बदलून राहत आहेत मात्र पोलिसांची नजर त्यांच्यावर पडताच विविध रहस्य समोर येत आहेत. या घुसखोरांकडून पोलिसांना मिळणारी माहिती धक्कादायक आहे. अखेर या घुसखोरांना कोणाचा वरदहस्त आहे, दिल्लीतही बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई झाली होती. दिल्लीच्या कालिंजी कुंज, वसंत कुंज, रंगपुरी, रूची बिहार इथं घुसखोरांची शोध मोहिम सुरू होती. दिल्ली पोलिसांनी बऱ्याच घुसखोरांना पकडून पुन्हा बांगलादेशात पाठवले.

महाराष्ट्रात ज्या लोकांना पकडले, हे लोक मुंबईत गेली कित्येक वर्ष राहत होते. त्यांच्याकडे ती सगळी कागदपत्रे होती जी भारतीय नागरिकाकडे असतात परंतु हे सर्व बांगलादेशी घुसखोर असल्याचं सत्य समोर आले. आपली ओळख पटवण्यासाठी या लोकांनी जी कागदपत्रे पोलिसांना दाखवली ती सर्व बनावट असल्याचं सिद्ध झाले. त्यात जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्डसह पासपोर्टही आहे. बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांचे सिंडिकेट आहे. प्रत्येक बोगस कागदपत्रासाठी रेट ठरलेले आहेत. 

बनावट आधार कार्ड - ५ ते १० हजार रुपये
बनावट रेशन कार्ड - ५ ते १० हजार रुपये
बनावट महाराष्ट्र अधिवास - १० ते १५ हजार रुपये
बनावट पॅन कार्ड - ५ ते १० हजार रुपये

जर एखाद्या घुसखोराला परदेश प्रवासासाठी पासपोर्ट बनवायचा असेल तर त्याला ५० ते १ लाख रुपये द्यावे लागतात. पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले. फोन रेकॉर्डमधून व्हॉट्सअप कॉलिंग, फेसबुक कॉलिंग आणि विविध सोशल मिडिया एप्समधून ते बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्कात असतात. मुंबईसह महाराष्ट्र सरकारने नाशिक, अमरावती जिल्ह्यातही दोन एसआयटी बनवली आहे. तिथेही मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर स्थायिक झाल्याचं समोर आले आहे. मुंबईतील बोरिवली, एमएचबी कॉलनी, गणपत पाटील नगर, मालवणी, दहिसर इथल्या झोपडपट्टीत बांगलादेशी घुसखोर सापडले. नवी मुंबईत पनवेल, नेरुळ, उरण परिसरात १२ ते १५ हजार घुसखोर आढळले आहेत. 

दरम्यान, २०२२ मध्ये मुंबई पोलिसांनी १४७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली त्यातील २१ जणांना बांगलादेशात पाठवले. मागील ३ वर्षात बेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱअया ९२८ बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. बांगलादेशी घुसखोरांचे नेटवर्क केवळ बनावट कागदपत्रे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वास्तव्य करण्यापुरते मर्यादित नाही. घुसखोर हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेसाठी मोठा धोका आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांना मदत करणाऱ्यांना शोधणे सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे. 

Web Title: Operation Dhaka! Who is behind the Bangladeshi infiltrators?; Delhi to Mumbai racket exposed, SIT Form for investigation by Maharashtra Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.