शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

NIA Raid on Dawood Gang: ‘एनआयए’चे ऑपरेशन दाऊद; २९ ठिकाणी छापे; सलीम फ्रूटसह चार ताब्यात, चाैकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 06:39 IST

एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई व दिल्लीतील बड्या मंडळी टार्गेट असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार, मुंबई, ठाण्यात छापे टाकत महत्त्वपूर्ण कागदपत्रे, डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू असून, सर्च ऑपरेशनची व्याप्ती वाढू शकते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी सकाळपासून मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधितांच्या २९ ठिकाणी छापे टाकले. दहशतवाद्यांना कथितपणे पैसे पुरविणे, मनिलाँड्रिंग, हवाला रॅकेट, अमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी सिंडिकेटमधील संबंधितांच्या ठिकाणी एनआयएने चौकशी केली. या कारवाईमध्ये छोटा शकीलचा नातेवाईक सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट याच्यासह हाजी अली आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी व अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबईतील नागपाडा आणि भेंडीबाजारसह पायधुनी, ग्रँटरोड, माहीम, परळ, वांद्रे, सांताक्रूझ, गोरेगाव, बोरिवलीसह ठाण्यातील मुंब्रा अशा २९ अधिक ठिकाणी एनआयएकडून ‘सर्च ऑपरेशन’ करण्यात आले. संबंधित प्रकरणात जवळपास ८० हून अधिक जण एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. 

‘टेरर फंडिंग’चा दावारियल इस्टेट तसेच अन्य माध्यमांतून जमा झालेला पैसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा या सारख्या दहशतवादी संघटनांना पुरविला जात असल्याचा दावाही एनआयएने केला आहे. तसेच छापा टाकण्यात आलेली सर्व ठिकाणे दाऊदच्या निकटवर्तीयांशी संबंधित असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

स्लिपर सेलहायप्रोफाइल लोकांचे टेरर फंडिंग करणारे स्लिपर सेल डी कंपनीने तयार केले होते.काळा पैसा विविध क्षेत्रात गुंतविला जात  हाेता, असे एनआयएने म्हटले आहे. 

महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्तएनआयएला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई व दिल्लीतील बड्या मंडळी टार्गेट असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार, मुंबई, ठाण्यात छापे टाकत महत्त्वपूर्ण कागदपत्रे, डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू असून, सर्च ऑपरेशनची व्याप्ती वाढू शकते.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाDawood Ibrahimदाऊद इब्राहिम