केवळ ८ तासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 07:00 PM2018-07-01T19:00:00+5:302018-07-01T19:00:00+5:30

पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

Only 8 hours in the police station's murder case | केवळ ८ तासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा 

केवळ ८ तासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा 

googlenewsNext

मुंबई - काल दिवसाढवळ्या दुपारी ४ वाजताच्या सुमारास कमला रामण नगर येथील बैंगणवाडी रिक्षा स्टॅन्डजवळ  २५ वर्षीय मोहम्मद हुसेन अब्दुल हलीम शेख याची मस्करीत रंगवलेल्या केसांना हात लावल्याने कुमैलरजा सय्यद उर्फ शाहरुख खटमल (वय २३) याने चाकूने वार करत निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हे शाखा कक्ष - ६ ने केवळ ८ तासात हा खुनाचा छडा लावत आरोपी शाहरुखला घाटकोपर येथील छेडा  नगर येथून पलायन करत असताना बेड्या ठोकल्या आहेत. 

काल दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेख हा मित्रांसोबत बैंगणवाडी रिक्षा स्टॅन्डवर बसला असताना तेथून मोटार सायकलवरून जात असलेल्या शाहरुखच्या रंगवलेल्या केसांना शेखने मस्करीत हात लावला. मात्र, मस्करीची कुस्करी झाली आणि वादाचे पर्यवसन निर्घृण हत्येत झाले. रागाच्या भारत शाहरुखने स्वतः जवळ असलेल्या चाकूने शेखवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शेखच्या छातीवर, गळ्यावर, पाठीत चाकू भोसकून हत्या करण्यात आली. गेल्या आठवड्याभरातील हि तिसरी घटना असल्याने पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखा कक्ष - ६ ची पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी पाठवली. खबऱ्यांमार्फत पोलीसांना आरोपी नवी मुंबईहून घाटकोपर येथील छेडा नगरमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून राज्याबाहेर पलायन करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लागलीच पोलीसांनी त्यांची वेगवेगळी पथकांचा मानखुर्द, नवी मुंबई ते छेडा नगर परिसरादरम्यान सापळा रचला. एकमेकांच्या समन्वयाने पोलिसांनी आरोपी शाहरुखला काल रात्रीच अटक केली. शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात या आरोपीला देण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण - १) निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, महेश तोरस्कर, हेड कॉन्स्टेबल जयवंत संकपाळ, काळे आदी पोलिसांच्या पथकाने या आरोपीच्या ८ तासात मुसक्या आवळल्या आहेत. 

Web Title: Only 8 hours in the police station's murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.