भिवंडीत कमिशनच्या नावाने महिलेची ऑनलाइन फसवणूक
By नितीन पंडित | Updated: June 21, 2023 18:10 IST2023-06-21T18:09:49+5:302023-06-21T18:10:15+5:30
नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात त इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीत कमिशनच्या नावाने महिलेची ऑनलाइन फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: जास्तीचे कमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची ७० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात त इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहा अरुण सिंग वय 32 वर्ष रा. काटे मानिवली कल्याण असे ऑनलाइन फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून सदर महिला ही अंजुर फाटा परिसरात ओसवालवाडी येथील आयडीएफसी बँकेत काम करते. या ठिकाणी महिलेला ५ जून ते ७ जून दरम्यान व्हाट्सअप वर टेलिग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रीपेडटास्क नावाच्या गुंतवणुकीतून कमी वेळात जास्त कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात इसमाने महिलेच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून ६९ हजार ९२० रुपये भरायला सांगून कोणताही मोबदला दिला नाही. अखेर आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.