डोंगरी परिसरातील कांदा चोरणारी दुकली डोंगरी पोलिसाकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:21 AM2019-12-11T00:21:05+5:302019-12-11T00:21:18+5:30

डोंगरी पोलीस ठाणे गु .र.क्र. 208/ 19  कलम 379 भादवी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  नमूद गुन्ह्याच्या तपासात ...

Onion arrested by Dongari hill police who stole onion in the area | डोंगरी परिसरातील कांदा चोरणारी दुकली डोंगरी पोलिसाकडून अटक

डोंगरी परिसरातील कांदा चोरणारी दुकली डोंगरी पोलिसाकडून अटक

googlenewsNext

डोंगरी पोलीस ठाणे गु .र.क्र. 208/ 19  कलम 379 भादवी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  नमूद गुन्ह्याच्या तपासात अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक  प्रकाश दिनकर ,पो.हवा5900/सावंत, पो.शि.04 0747/ कदम, 050348 /मुल्ला, पो.शि.0918 95/ पवार ,पो.शि.110625/शेलार,  यांनी योग्य व अचुक तांत्रिक बाबींचा वापर करून दोन्ही पाहिजे आरोपी इसमांचे छायाचित्र प्राप्त कले व ते डोंगरी परिसरात व गुप्त बातमीदारांना दाखवले  गुप्त बातमीदार यांनी छायाचित्रातील मिळत्याजुळत्या वर्णनाचा इसम हा पालागल्ली येथे राहत असल्याबाबत माहिती दिली.

त्यावरून पालागल्ली येथे सापळा लावून एक इसम मोटर स्कूटरसह ताब्यात घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव  साबिर मो शफी शेख वय 30 वर्ष ,असल्याचे सांगितले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने त्याचा मेहुणा नामे इमरान शेख त्याच्या मदतीने शिवडी,भायखळा,डोंगरी,वडाळाया परिसरात कांद्याची चोरी केल्याचे सांगितले. तसेच नमूद गुन्ह्यातील त्याचा मेव्हणा यास गुडलक बिल्डिंग दुसरा माळा केजीएन गेस्ट हाऊस च्यावर डोंगरी,  मुंबई या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणले व त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी दोघांनी संगणमत करून  नमूदचा गुन्हा केल्याबाबत माहिती दिल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.  

नमूद आरोप इसमाने सध्या वाढलेल्या कांद्याच्या दरामुळे  चोरी करून डबल नफा मिळवण्यासाठी  सदरचा प्रकार केल्या बाबतची तपासात माहिती दिलेली आहे. तरी सदरच्या दोन्ही आरोपीताने वडाळा डोंगरी शिवडी व भायखळा या परिसरामध्ये कांद्यांच्या स्टोर वरून कांद्याची चोरी केले बाबत माहिती दिलेली आहे.

Web Title: Onion arrested by Dongari hill police who stole onion in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.