ओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 02:38 IST2019-07-23T02:38:41+5:302019-07-23T02:38:53+5:30

सोमवारी रात्री 9. 30 च्या सुमारास विकी श्रीनिवास गंजी, वय 33 वर्षे रा. ठी. फ्लॅट नं. 311, नर्मदा इमारत, हिरा पन्ना मॉलजवळ, ओशिवरा, येथील त्यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी गोळीबार केला.

One shot dead in Oshiwari | ओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू 

ओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू 

मुंबई: ओशिवरा परिसरात विकी नामक इसमावर एका फ्लॅटमध्ये घुसून अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या मागे नर्मदा इमारत क्रमांक तीन याठिकाणी साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला असुन त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोराने त्याच्या छातीवर गोळी मारत तो पसार झाल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. याची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी धाव घेतली असून या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. विकीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

सोमवारी रात्री 9. 30 च्या सुमारास विकी श्रीनिवास गंजी, वय 33 वर्षे रा. ठी. फ्लॅट नं. 311, नर्मदा इमारत, हिरा पन्ना मॉलजवळ, ओशिवरा, येथील त्यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी गोळीबार केला. अज्ञात कारणावरून त्यांच्या डाव्या छातीवर गोळीबार केला. उपचाराकरिता त्यांना कूपर हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील घटनेचा तपास करत आहेत. 

 

Web Title: One shot dead in Oshiwari