शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कुंडीत चावी ठेवल्याने चोरी करणे झाले सोपे : एका दुकानदाराने केली दुसऱ्या दुकानात चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 16:37 IST

धनकवडीत अशाच प्रकारे दरवाजाजवळील कुंडीत चावी ठेवणे महागात पडले़..

पुणे : घरातील लोकांना अथवा कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना चावी देण्यापेक्षा दरवाजाजवळ एखाद्या वस्तूखाली चावी ठेवण्याची पद्धत अजूनही वापरली जाते़. त्यात सोय असली तर त्यातून चोरीचा धोका असतो़. धनकवडीत अशाच प्रकारे दरवाजाजवळील कुंडीत चावी ठेवणे महागात पडले़. के़के़ मार्केटमधील एका दुकानदाराने बाहेर ठेवलेली चावी घेऊन दुसऱ्याचे कार्यालय उघडले व आतील ९० हजार रुपयांचे सीपीयु, मॉनिटर, मोबाईल, रोकड चोरुन नेले़.सहकारनगर पोलिसांनी या दुकानदाराला अटक केली आहे़. आकाश प्रल्हाद कदम (रा़ ओम अपार्टमेंट, धनकवडी) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी व्यंकटराव दत्तात्रय कराड (वय २६, रा़ केशव कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे़. व्यंकटराव कराड यांचे केके मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर विन लोन कन्सल्टन्सी नावाचे कार्यालय आहे़. त्याच ठिकाणी आकाश कदम याचे दुकान आहे़. कराड यांच्याकडे अनेक कर्मचारी येत असल्याने ते कार्यालयाची चावी कुंडीत ठेवत असत़, आकाश कदम याने ते पाहिले होते़. २२ जुलैच्या रात्री कार्यालय बंद झाल्यानंतर कदम याने कुंडीतील चावी घेऊन कार्यालय उघडले़. आतील २ कॉम्प्युटर, मॉनिटर, ३ मोबाईल, रोख रक्कम  चोरुन नेली़ दुसऱ्या  दिवशी सकाळी कार्यालय उघडल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला़. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़. एकंदर परिस्थिती व सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांना कदम याच्यावर संशय आला़. त्यांनी कदम याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली़. पोलिसांनी त्याच्या दुकानातून चोरीचा सर्व माल जप्त केला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी