भांडणाच्या रागातून साकीनाका येथे एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 09:48 PM2019-12-20T21:48:43+5:302019-12-20T21:50:22+5:30

या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

One murdered due to dispute in Sakinaka | भांडणाच्या रागातून साकीनाका येथे एकाची हत्या

भांडणाच्या रागातून साकीनाका येथे एकाची हत्या

Next
ठळक मुद्दे शाहिद शेख यांच्या डाव्या छातीवर व डाव्या पाठीवर सुऱ्याने वार करून जीवे ठार मारले. साकीनाका पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली आहे.

मुंबई - भांडणाच्या रागातून धारदार सुऱ्याने वार करून एकाची हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साकीनाका येथे घडली. साकीनाका पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी १७ डिसेंबर रोजी  रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अल्वान टेक्स टाईल्ससमोर, जी. एम.कॉलनी, गुलाम मोहम्मद चाळ, दुर्गामाता मंदिर रोड, साकीनाका या ठिकाणी यातील अटक आरोपीने शाहिद अमिन शेख (३२) याच्याशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शाहिद शेख यांच्या डाव्या छातीवर व डाव्या पाठीवर सुऱ्याने वार करून जीवे ठार मारले. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

Web Title: One murdered due to dispute in Sakinaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.