शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची तीन तरुणांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू; 6 पोलिस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 10:25 IST

बाहेर गावावरुन आलेल्या तरुणांकडून खंडनी वसुल करण्यासाठी मारहाण केल्याचा पोलिसांवर आरोप.

गोरखपूर: हॉटेलमध्ये छापेमारीदरम्यान पोलिसांनी तरुणांना केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हॉटेलमध्ये थांबलेल्या तीन तरुणांकडून खंडणी वसुल करण्यासाठी त्यांच्या खोलीत छापेमारी केल्याचा गोरखपूर पोलिसांवर आरोप आहे. या घटनेनंतर या प्रकरणातील आरोप असलेल्या 6 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. मृत तरुणाची पत्नीने पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष, प्रदीप आणि अरविंद हे तीन तरुण गोरखपूरला आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी आले होते. सोमवारी सकाळी 8 वाजता रामगढ ताल परिसरातील कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये ते थांबले. सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास अचानक काही पोलीस त्यांच्या खोलीत पोहोचले आणि त्यांची आयडी तपासल्यानंतर त्याच्या सामानाची शोधाशोध करू लागले.

खोलीत घुसून तरुणांना मारहाणयावेळी तरुणांनी पोलिसांना या छापेमारीचे कारण विचारले असता पोलिसांनी अरविंद नावाच्या तरुणाला मारहाण करत खोलीबाहेर ओढले. अरविंदने सांगितल्यानुसार, जेव्हा तो खोलीबाहेर उभा होता, तेव्हा त्याने खोलीच्या आतून मनीषला मारहाण केल्याचा आवाज ऐकला आणि पोलिस त्याला बाहेर आणत असल्याचे पाहिले. मनीषच्या चेहऱ्यातून खूप रक्तस्त्राव होतं होता. यानंतर पोलिसांनी त्याला त्यांच्या कारमध्ये बसवले आणि रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

पोलिसांवर वसुलीचा आरोपगोरखपूरचे रहिवासी राणा प्रताप चंद उर्फ ​​चंदन सैनी यांनी सांगितले की, तिघे त्याचे मित्र आहेत आणि त्याला भेटण्यसाठी गोरखपूरला आले होते. पण, तरुण बाहेर गावावरुन आल्याचे कळताच पोलिसांनी त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी त्यांना खोलीत घुसून मारहाण केली, असा आरोप पोलिसांवर आहे. दरम्यान, मनीष गुप्ताच्या पत्नीने त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच कानपूरहून गोरखपूर गाठले. आता पोलिसांवर खुनाचा खटला चालवण्याची मागणी मनीषच्या कुटुंबियांकडून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसExtortionखंडणी