विरारला गोळीबारात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:47 IST2019-12-17T05:47:52+5:302019-12-17T05:47:58+5:30

मोबाइलचे दुकान लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांचा हल्ला

One killed, one injured in firing on Virar | विरारला गोळीबारात एक ठार, एक जखमी

विरारला गोळीबारात एक ठार, एक जखमी

नालासोपारा : विरार पूर्वेकडील कुंभारवाडा येथील मोबाईलचे दुकान लुटण्यासाठी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात मालक गंभीर जखमी झाला असून त्याचा एक सहकारी ठार झाला आहे. रविवारी रात्री साडेनऊला घडलेल्या या घटनेमुळे विरारमधील दुकानदारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
विरार (पूर्व) कुंभारवाडा येथील रिद्धी-सिद्धी मोबाइल दुकानामध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजता दोन दरोडेखोर शिरले. त्या वेळी दुकानात मालक विशाल गुप्ता आणि त्यांचा मेहुणा विजयकुमार गुप्ता असे दोघे जण होते. त्यांच्याकडे दरोडेखोरांनी पैशाची मागणी केली. त्या वेळी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दरोडेखोरांनी गावठी कट्ट्यातून त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघांनाही गोळ्या लागल्या.
गोळीबाराचा आवाज ऐकून अन्य दुकानदार घटनास्थळी धावून गेले. त्यामुळे दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक दरोडेखोर नागरिकांच्या हाती लागला, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात मालक विजयकुमार गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांचा
मेहुणा विशाल गुप्ता यांचे निधन झाले. दरोडेखोर दुचाकीवरून आले होते.
या घटनेनंतर त्यांची बाईक, गोळीबार केलेला गावठी कट्टा आणि एक दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला आहे.

Web Title: One killed, one injured in firing on Virar