भाम्बेरी येथे आपसी वादातून वडील आणि मुलाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 14:36 IST2021-05-29T12:24:38+5:302021-05-30T14:36:30+5:30
Crime news : आपसी वादातून हे हत्याकांड घडले आहे.

भाम्बेरी येथे आपसी वादातून वडील आणि मुलाची हत्या
तेल्हारा : आजची सकाळ अकोला जिल्ह्यासाठी रक्तरंजित निघाली असून तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भांबेरी या गावात आपसी वादातून वडील आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. यात वडिलांच्या जागीच मृत्यू झाला, तर गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावात सुत्रांनकडून मिळालेल्या माहिती नुसार भांबेरी येथील देविदास भोजने आपल्या परिवारासोबत राहतात. गावात आपसी वाद बऱ्याच वर्षापासून सुरू होता. आज पहाटेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेल्याने अंदाजे ७० वर्षीय देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबरदस्त प्रहार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देवीदास भोजने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर देविदास भोजने यांचा मुलगा तीस वर्षीय अजय भोजने याला देखील जबर मारहाण करण्यात आली. त्या अवस्थेत पडलेल्या अजय भोजने याला तात्काळ उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणले असता स्थानिक डॉक्टरांनी अकोला रुग्णालय येथे हलवण्याचे सांगितले. सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तेथे अजयचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेत तीन संशयित आरोपीला अटक केली असून नेमकी ही हत्या कोणी व का केली याचा तपास सुरू आहे. आज सकाळी घडलेल्या या हत्याकांडाने येणारा परिसर हादरून आहे.