कामशेत : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नायगाव गावाच्या हद्दीत हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि.१) पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास चिंचवड (वल्लभ नगर) ते कार्ला जाणाऱ्या पायी दिंडीला मागच्या बाजूने अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये ४ जण जखमी झाले तर उपचारादरम्यान १ जणांचा मृत्यु झाला. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ( दि. १) रोजी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास चिंचवड (वल्लभ नगर) ते कार्ला येथे एकविरा देवीला जाणाऱ्या पालखीला नायगाव या गावाच्या हद्दीत पुणे मुंबई लेनवर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली.या अपघातात या अपघातात याज्ञिक रविंद्र मोरे (वय १९ रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला तर शारदा शाम वाळुंजकर ( वय ४२), स्वाती तुळसीराम कोळी (वय ३०), सुनीता हिरानंद पाटील ( वय २५), अक्षय सुनील बरावकर ( वय १९, सर्व रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यावर सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस करत आहे.
एकविरा देवीला जाणाऱ्या पायी पालखीला अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू, चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 19:14 IST