क्षुल्लक कारणावरून हाणामारीत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 10:08 IST2020-05-26T10:07:47+5:302020-05-26T10:08:15+5:30

नागोराव राजाराम मुंडे असे मृतकाचे नाव आहे.

One died in a fight over a minor matter | क्षुल्लक कारणावरून हाणामारीत एकाचा मृत्यू

क्षुल्लक कारणावरून हाणामारीत एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
उरळ/हातरूण : क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटन मांजरी येथे २५ मे रोजी घडली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नागोराव राजाराम मुंडे असे मृतकाचे नाव आहे.
मांजरी येथील नागोराव मुंडे हे २५ मे रोजी दुपारी गावातील चौकात किराणा आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याबरोबर रूपेश सदानंद गाडगे व महादेव गोकूळ पवार यांनी वाद घातला. या वादातून त्यांनी मुंडे यांना बेदम मारहाण केली. मुंडे यांची पत्नी मीरा यांनी हा वाद सोडवला. तसेच बेशुद्धावस्थेत पडलेल्या नागोराव मुंडे यांना घरी आणले. त्यानंतर काही वेळाने नागोराव मुंडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मीरा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर मावस्कर, अनिल येन्नेवार, पो.कॉ. रघुनाथ नेमाडे, एएसआय दादाराव लिखार, हे.कॉ. संजय कुंभार, विजय चव्हाण, पो.कॉ. प्रवीण मोरे, शैलेश घुगे करीत आहेत.

Web Title: One died in a fight over a minor matter