ओशिवऱ्यात गोळीबार; छातीला गोळी लागल्यानं एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 22:52 IST2019-07-22T22:50:51+5:302019-07-22T22:52:42+5:30
गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ

ओशिवऱ्यात गोळीबार; छातीला गोळी लागल्यानं एक गंभीर जखमी
मुंबई: ओशिवरा परिसरात विकी नावाच्या एका व्यक्तीवर एका फ्लॅटमध्ये गोळीबार करण्यात आला. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या मागे नर्मदा इमारत क्रमांक तीन याठिकाणी साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हल्लेखोर विकीच्या छातीवर गोळी मारुन पसार झाल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे. याची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी धाव घेतली असून या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. विकीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.