शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४५ लाखांच्या वन्यजीव प्राण्यांच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 19:26 IST

मुंबईतील समीर शांताराम जाधव (37) याला गुरूवारी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

ठळक मुद्देवाघ हे विदर्भात असल्याने त्याचा विदर्भाशी काही कनेक्शन आहे कापुरबावडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा 1971 चे कलम 9,39,44,48 (अ),49,49 (अ), 51 प्रमाणो गुन्हा दाखल हस्तगत केलेल्या ऐवजाची किंमत ४५ लाख रुपये असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे किंमत दोन कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.

ठाणे - वाघ, बिबटय़ा आणि मगर यांच्या कातडय़ासह दोन हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या मुंबईतील समीर शांताराम जाधव (37) याला गुरूवारी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. तसेच त्याच्याकडून हस्तगत केलेल्या ऐवजाची किंमत ४५ लाख रुपये असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे किंमत दोन कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच वाघ हे विदर्भात असल्याने त्याचा विदर्भाशी काही कनेक्शन आहे याचा ही शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी गुरूवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठाण्यातील बाळकुम - माजिवाडा रोडवर वन्यजीव प्राण्याचे कातडे व हस्तीदंताची तस्करी करत एक जण त्याची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती.त्यानुसार, गुरूवारी दुपारी वन अधिकाऱ्यांसह खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या समीर याला ताब्यात घेतले. तो व्यवसायाने वाहन चालक आहे. तसेच त्याच्याकडून जप्त केलेल्या वाघ आणि बिबटय़ांची कातडय़ावरून ते लहान असण्याची शक्यता आहे. तर, मगरमध्ये भुसा भरण्यात आलेला आहे. त्याने हे कातडे आणि हस्तीदंत कुठून आणले. तसेच तो कोणाला विकण्यासाठी आला होता. तसेच तो सराईत आहे का? याबाबत शोध घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा 1971 चे कलम 9,39,44,48 (अ),49,49 (अ), 51 प्रमाणो गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तसेच त्याला शुक्रवारी ठाणो न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त देवराज यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक विकास बाबर, हेमंत ढोले, रोशन देवरे, विलास कुटे, सहायक पोलीस निरीक्षक भिवणकर या पथकाने केली.

टॅग्स :Smugglingतस्करीwildlifeवन्यजीवPoliceपोलिसAnti Extortion Cellखंडणी विरोधी पथकArrestअटक