‘त्या’ रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 04:08 IST2018-08-04T04:08:06+5:302018-08-04T04:08:14+5:30

जुन्या वैमनस्यातून अंबादास शिंदे (४५) नामक रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. सोमवारी हा प्रकार बोरीवलीत घडल्यानंतर शुक्रवारी क्राइम ब्रांचच्या कक्ष - ११ने एकाच्या मुसक्या आवळल्या, तर उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

 One arrested in the murder of the autorickshaw driver | ‘त्या’ रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

‘त्या’ रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

मुंबई : जुन्या वैमनस्यातून अंबादास शिंदे (४५) नामक रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. सोमवारी हा प्रकार बोरीवलीत घडल्यानंतर शुक्रवारी क्राइम ब्रांचच्या कक्ष - ११ने एकाच्या मुसक्या आवळल्या, तर उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
भारत नितीन दास उर्फ सोनू खड्डा (२०) असे अटक आरोपीचे नाव आहे. शिंदे याच्या खुनात सहभाग असलेल्यांपैकी एक संशयित मित्राला भेटण्यासाठी दहिसर चेकनाका परिसरात येत असल्याची माहिती क्राइम ब्रांचचे पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांना मिळाली. त्यानुसार कक्षप्रमुख चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा रचून दासला अटक केली.
दासने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शिंदे त्याला आणि त्याच्या साथीदारांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. सोमवारी रात्रीदेखील शिंदेने त्यांना मारहाण केली होती. याच रागात त्याचा काटा काढल्याचे दासने पोलिसांकडे कबूल केले आहे.
शिंदे हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर तीन गुन्हे दाखल
होते. बोरीवली पोलिसांसह क्राइम ब्रांच या प्रकरणी अधिक चौकशी करीत होती.

Web Title:  One arrested in the murder of the autorickshaw driver

टॅग्स :Arrestअटक