रेल्वे बोगस भरती प्रकरणात एकाला अटक; सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींना फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 05:57 IST2023-02-27T05:56:37+5:302023-02-27T05:57:28+5:30
२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली लष्करातून सेवानिवृत्त झाला असल्याचे समजते.

रेल्वे बोगस भरती प्रकरणात एकाला अटक; सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींना फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंत्रालयापाठोपाठ रेल्वेत १४ लाखांत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत मुंबईसह सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींना फसवणूक केल्याच्या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. शांताराम सकपाळ असे त्याचे नाव असून, तो लष्करातून सेवानिवृत्त झाला असल्याचे समजते. न्यायालयाने त्याला २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
हरिश्चंद्र कदम यांनी यासंदर्भात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिस तपास सुरू होता. रविवारी या प्रकरणात सकपाळ याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. सकपाळच्या चौकशीतून या टोळीच्या मुळापर्यंत जाण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सकपाळसह चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.
रेल्वेतून मेल आल्याचे भासवून रेल्वेची बनावट नोकरीवर हजर होण्याची ऑर्डर देऊन, त्यावर बनावट सही करून, बनावट शिक्क्यांच्या वापर करून, ती ऑर्डर खरी असल्याचे भासवून उमेदवारांना देण्यात आल्या. त्यानुसार, सुरुवातीला भुसावळ ट्रेनिंग सेंटर गाठले.
मात्र, तेथे गेल्यानंतर ऑर्डर कॉपी बनावट असल्याचे समजताच तरुणांना धक्का बसला. त्यानंतर १३ जणांना चेन्नईला पाठविण्यात आले. तेथे गेल्यानंतर एका रेल्वेचे ट्रेनिंग सेंटर सांगून एका खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये एक महिना ट्रेनिंग पूर्ण करण्यास भाग पाडल्याचे तरुणांचे म्हणणे आहे.