Kirit Somaiya Attacker Arrested: किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी एकाला अटक; शिवसेनेचे कार्यकर्ते मंगळवारी होणार पोलीस ठाण्यात हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 21:59 IST2022-02-07T21:58:29+5:302022-02-07T21:59:52+5:30
Kirit Somaiya attack case in Pune: किरीट सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकविण्याचा प्रकार सनी गवते याने केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो दिसून येतो. त्यावरून त्याला अटक केली आहे.

Kirit Somaiya Attacker Arrested: किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी एकाला अटक; शिवसेनेचे कार्यकर्ते मंगळवारी होणार पोलीस ठाण्यात हजर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकाला क्वॉटरगेट येथून पकडले. सनी गवते (वय ३९, रा. नाना पेठ) असे त्याचे नाव आहे.
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, किरीट सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकविण्याचा प्रकार सनी गवते याने केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो दिसून येतो. त्यावरून त्याला अटक केली आहे. शहर प्रमुख संजय मोरे व इतरांचा शोध घेण्यात येत आहे.
किरीट सोमय्या हे शनिवारी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. यावेळी धक्काबुक्की झाल्याने सोमय्या पायऱ्यांवर पडल्याने जखमी झाले होते.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे आणि युवा सेना सहसचिव किरण साळी यांनी व्हॉटस्ॲपवर मेसेज पाठविला असून न्यायव्यवस्था व महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान ठेवून आम्ही सर्व शिवसैनिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उद्या सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहोत.