शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 21:03 IST

Dombivali Gangrape Case : आरोपींना लवकरात लवकर अटक केली अस म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेणारे  पोलीस आता या फरार आरोपीचा शोध कधी घेतात? ते पहावं लागणार आहे. 

ठळक मुद्देसामूहिक बलात्काराप्रकरणी आतापर्यंत आरोपींची संख्या 34 झाली  आहे. याप्रकरणी 9 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र  न्यायालयाने  मंगळवारी 9 आरोपींना न्यायालयीन कोठडी  सुनावली आहे. सोमवारी 22 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आता संबंधित आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी 33 आरोपींना आतापर्यंत बेड्या  ठोकण्यात आल्या आहेत मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक केली, असं म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस आता या फरार आरोपीचा शोध कधी घेतात? ते पहावं लागणार आहे.        

सामूहिक बलात्काराप्रकरणी आतापर्यंत आरोपींची संख्या 34 झाली  आहे. याप्रकरणी 9 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायाधीश एस आर पहाडे यांच्या समोर आरोपींना हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अजूनही एक आरोपी फरार असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. हे प्रकरण  गंभीर आणि घृणास्पद असल्याचं कोर्टानं देखील म्हटलं होतं. घटना घडल्यानंतर  एकामागोमाग आरोपींना पकडण्याचा धडाका पोलिसांनी लावला होता.

इतकंच नाही तर  याबाबत पोलीस प्रशासनाच कौतुक देखील करण्यात आलं. 22 सप्टेंबरला अल्पवयीन  मुलीने पोलीस ठाण्यात  धाव घेतली .या गंभीर  घटनेला इतके  दिवस उलटूनही पोलीसांच्या हाती एक आरोपी लागत नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आरोपीला शोधण्यासाठी तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाल्याची पोलिस सूत्रांनी माहिती दिली. यासंदर्भात मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांना संपर्क साधला असता एक आरोपी फरार असून पोलिस तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण