शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

महिला दिनीच नागपुरात गुंडागर्दीचा कहर... कॅबमध्ये बसलेल्या तरुणीला मारहाण

By योगेश पांडे | Updated: March 8, 2024 23:54 IST

झीरो माइलजवळ मध्यरात्री घडला प्रकार : सीसीटीव्हींचे जाळे असूनही आरोपी फरारच

नागपूर : उपराजधानीत हत्या व इतर गंभीर गुन्ह्यांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच आता गुंडागर्दीचा कहरदेखील समोर आला आहे. शहराच्याच नव्हे देशाचे केंद्रस्थान असलेल्या झीरो माइलजवळ मध्यरात्री कॅबमधून जाणाऱ्या एका तरुणीला महिलादिन सुरू झाल्यावर काहीच वेळात सात ते आठ गुंडांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर त्यांनी दोन ते तीन दिवसांतच तिचे अपहरण करण्याची देखील धमकी दिली. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यानंतर पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

संबंधित तरुणी नागपुरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्या एका बहिणीचा वाढदिवस असल्याने तिला मानकापूरला जायचे होते. तिने दक्षिण पश्चिम नागपुरातून कॅब बुक केली. कॅबचालक तिच्या घरी आला व तेथून ती कॅबमधूनच मानकापूरच्या दिशेने निघाली. झीरो माइल ते फ्रीडम पार्कदरम्यान अचानक कॅबमधील पेट्रोल संपले. कॅबचालकाने फोन करून त्याच्या एका मित्राला बोलावले. तरुणी कॅबमध्येच बसली होती. दोघेही मित्र पेट्रोल आणण्यासाठी संविधान चौकातील पेट्रोल पंपावर गेले. मात्र त्यांना पेट्रोल मिळाले नाही. त्यामुळे ते परत आले. त्याचवेळी राँगसाईडने तीन मोपेडवरून सात ते आठ तरुण तेथे पोहोचले. तरुणांपैकी एकाने थेट कॅबजवळ येऊन मुलीच्या गालावर झापड मारली. तर इतर तरुण तिला अश्लील शिवीगाळ करत होते. 

कॅबचालक हिमांशू व सतीश यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील तरुणांनी बेदम मारहाण केली. एकाचे तर डोकेदेखील गाडीवर आदळले. त्यानंतर त्यांनी परत तरुणीकडे मोर्चा वळविला. या प्रकाराने तरुणी हादरली होती. आरोपींनी तिला दोन ते तीन दिवसांत तुझ्या घरून पळवून नेऊ अशी धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपी मोपेड्सवरून फरार झाले. एका कॅबचालकाने पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. सीताबर्डी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. अगोदर सर्वांना मेडिकल इस्पितळात नेण्यात आले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तरुणीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपींचा शोध कधी लागणार?शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या भागात असा प्रकार झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनास्थळापासून काही अंतरावर परिमंडळ दोन उपायुक्तांचे कार्यालय आहे. संबंधित मार्गावर रात्रीदेखील वाहतूक सुरू असते. याशिवाय त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेदेखील आहेत. मात्र, त्यानंतरदेखील आरोपींचा सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता. कॅब कंपनीच्या नियमांप्रमाणे कॅबमधील पेट्रोलदेखील संपायला नको होते. मात्र, मध्यरात्री कॅब चालवत असताना कॅबचालकाने या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर