वृद्ध मातेची दगडाने ठेचून हत्या; आरोपी मुलगा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 10:28 IST2020-06-01T10:26:50+5:302020-06-01T10:28:18+5:30
शशिकला येवले असे मृतक महिलेचे नाव आहे.

वृद्ध मातेची दगडाने ठेचून हत्या; आरोपी मुलगा गजाआड
बोरगाव मंजू : वृद्ध मातेची मुलाने दगडाने ठेचून हेत्या केल्याची घटना ३१ मे रोजी बोरगाव मंजूनजीक घडली. शशिकला येवले असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
बोरगाव मंजूकडून अमरावतीकडे महामार्गावरून अमोल येवले (३५) व त्याची आई शशिकला येवले रा. चोहोट्टा बाजार हे दोघे माय-लेक पायी जात होेते. दरम्यान, बोरगाव मंजूनजीक पोहोचताच अमोल येवले याने आपल्या आईचा दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर आरोपी मुलगा पोलीस येईपर्यंत मृतदेहाजवळच होता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हरीश गवळी यांनी सहकाऱ्यासंह घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. दरम्यान, मुलाने आईची हत्या का केली, याविषयी माहिती मिळू शकली नाही. आरोपी मुलाविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी, पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव, हेकॉ. गणेश निमकंडे व विष्णू ढोरे करीत आहेत.
फोटो आहे