शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे...सांताक्रूजच्या बंटी - बबलीने चक्क ७०० लोकांना लावला चुना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 21:12 IST

गुंतवणूकींच्या नावाखाली 700 जणांना कोट्यावधी रुपयांना गंडा

मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूक करून जाडा परतावा देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेने ७०० गुंतवणूकदारांना चांगला जाडा परतावा देण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांना गंडा घालणाऱ्या ठग जोडप्याला अटक केली आहे. रईसा पुनावाला(वय - ४३) व तिचा पती मुस्तफ्फा बेग(वय -४०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दांपत्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महाराष्ट्र प्रोटेक्‍शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपोझिटर्स(एमपीआयडी) कायद्याअंतर्गत अटक केली. 

सांताक्रूझ परिसरात राहणारे पुनावाला आणि बेग या दांपत्यांनी २०१२ ते २०१७ या कालावधीत आरएस ट्रेडर्स नावाने कंपनी सुरू केली होती. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना शंभर दिवसांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे थोडेतोकडे नाही तर मुंबईसह मुंबई बाहेरच्या सातशे जणांनी कोट्यावधी रुपये कंपनीत गुंतवले. सुरवातीला आरोपींनी काहींना रक्कम दिली. त्यामुळे झालेल्या सुमारे सातशेहून अधिक जणांनी यामध्ये गुंतवणूक केली. रईसाच्या पहिल्या पतीने मोठ्या रकमेची गुंतवणूक विम्यामध्ये केली होती. त्यामुळे गुंतवणूक योजना बुडाली, तरी गुतवणूकीची रक्कम परत करू शकतो, असे गुंतवणूकदारांना आश्‍वासन दिले होते. त्यामुळे 50 हजार ते 40 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली. मात्र, शंभर दिवसांनंतर आरोपींनी कोणतीही रक्कम गुंतवणूकदारांना दिली नाही. त्यानंतर आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. अखेर याप्रकरणी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला. अखेर याप्रकरणी नुकतीच आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रArrestअटक